मागच्या वर्षापासून कोरोना ने भारतातच नाही तर आख्ख्या जगात धुमाकूळ घातला आहे. असंख्य लोकांना कोरोना चा सामना करताना अक्षरशः नाकीनऊ आले आहेत. त्यामुळे आरोग्यावर होणारा प्रचंड प्रमाणात खर्च हा जवळ जवळ आवाक्याबाहेरचा आहे.
तसेच बहुतांशी लोक आता आरोग्याबद्दल व आरोग्याच्या बाबतीतल्या भविष्यातील सुरक्षितता याच्याबद्दल जागरुक झाली आहेत. त्यामुळे भविष्यात कोरोना असो किंवा एखादा आजार यामुळे उद्भवणारी आर्थिक संकटे यापासून स्वतःचा बचाव करण्यात यावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य विमा योजना मार्केटमध्ये आहेत.
यातच आता एसबीआय जनरल इन्शुरन्स या आघाडीच्या विमा कर्त्या कंपनीतर्फे आरोग्य सुप्रीम ही सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना सादर करण्यात आली आहे. त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
एसबीआय जनरल इन्शुरन्स ची आरोग्य सुप्रीम योजना
एसबीआय जनरल इन्शुरन्स या आघाडीचा विमा कर्त्या कंपनीने आरोग्य सुप्रीम ही सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना सादर केली आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेमध्ये ग्राहकांना 20 मूलभूत संरक्षण म्हणजेच बेसिक कव्हरेज आणि आठ वैकल्पिक संरक्षण देणारे पूर्ण विमा संरक्षण मिळावे, या बाबतीतली खातरजमा करण्यासाठी ही विशिष्ट योजना रचण्यात आली आहे. तसेच या पोलिसी चे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 5 कोटी रुपयांपर्यंत विम्याचे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये ग्राहकांसाठी तीन पर्याय करण्यात आले आहेत. पहिला म्हणजे प्रो, दुसरा म्हणजे प्लस, आणि तिसरा म्हणजे प्रीमियम.
यामध्ये ग्राहक विम्याची रक्कम आणि संरक्षण वैशिष्ट्यांच्या आधारे या तीनही पर्याय मधून एकाची निवड करू शकतात. तसेच या पॉलिसीमध्ये रिकवरी बेनिफिट,कम्प्या शनेट विजिट, सम इनसुर्ड रिफील अशा ग्राहक स्नेही कवरेजपैकी कस्टमर पॉलिसीसाठी एक ते तीन वर्षांची पॉलिसीची मुदत निवडू शकणार आहेत.
एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पी. सी. कंदपाल म्हणाले की, आजच्या परिस्थितीत आरोग्य विमा हा पर्याय नसून गरज झाली आहे. आरोग्य सुप्रीम या विमा योजनेमध्ये असलेले पुनर्स्थापना वैशिष्ट्ये आणि विमा पॉलिसी चा रकमेचे अनेकविध पर्याय असल्यामुळे ग्राहक त्यांच्या सोयीनुसार प्रीमियम आणि मुदत यांची निवड करु शकणार आहेत.
Share your comments