1. इतर बातम्या

घरी बसल्याच करा आधार मधील या चार गोष्टी अपडेट

आधार कार्ड हे सगळ्यात आवश्यक कागदपत्रं पैकी एक आहे. शासकीय योजना असो की कुठल्याही प्रकारच्या ऑफिशियल कामांसाठी आधारकार्ड हे लागतेच लागते.या आधार कार्ड मधील एक छोटीशी चूक आपल्याला मनस्ताप देऊ शकते. आधार कार्ड मध्ये झालेली कुठलीही छोटीशी चूक दुरुस्त करण्यासाठी आपल्याला आधार सेंटरवर जाऊन रांगेत उभे राहावे लागते व नाहक होणाऱ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की, आधार कार्ड संबंधी अशी चार कामे आहेत कि ती करण्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रात जाण्याची गरज नसते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
aadhar update

. तुम्ही घरी बसून ऑनलाईन काम करू शकता. सेल्फ सर्विस अपडेट पोर्टल च्या माध्यमातून  आपण नाव, जन्मतारीख, पत्ता आणि लिंग ऑनलाइन अपडेट करू शकतात. याबद्दलची माहिती यूआयडी आईने ट्विटरद्वारे दिली आहे. यामध्ये लिहिले आहे की, जर तुम्हाला तुमचा पत्ता आधार कार्ड मध्ये बदलायचा असेल तर तुम्ही  सेल्फ सर्विस अपडेट पोर्टल च्या माध्यमातून हे करू शकता. याकरिता प्रत्येक अर्जासाठी पन्नास रुपये शुल्क घेऊन  एकावेळी एकापेक्षा अधिक तपशील अपडेट करू शकता.

 ही सुविधा घेण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी संलग्न असावा. कारण  आपण अपडेट करत असताना बार्शी रजिस्टर असलेल्या मोबाईल वर आपल्याला आधार प्रमाणीकरणासाठी चा ओटीपी मिळतो. जर  तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक नोंदविला नसेल तर तो नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कायमस्वरूपी नोंदणी  केंद्राला भेट द्यावी लागेल.

 आवश्यक कागदपत्रे

 तुम्ही तुमच्या आधार कार्ड मध्ये नाव, जन्मतारीख किंवा पत्ता बदलू इच्छित असल्यास आपल्याला सत्यपणासाठी प्रत्येक कागदपत्राची स्कॅन केलेली प्रत सबमिट करावी लागेल. परंतु लिंग अपडेट साठी कोणत्याही दस्तऐवजाचे आवश्यकता नाही.

 आपल्या हाताची स्टेटस कशी पहावी?

 आपल्या आधार कार्डची अपडेट ची स्थिती पाहण्यासाठी यु आर एन आणि आपला आधार क्रमांकाचा वापर https://ssup.uidai.gov.in/checkSSUPSstatus/checkupdatestatus या लिंक वर करावे. ही सेवा विनामूल्य नाही. तुम्हाला तुमच्या प्रत्येक अपडेट साठी यु आय डी ए आय आपणास पन्नास रुपये शुल्क आकारते. आधार कार्ड मध्ये आपल्याला फक्त दोनदा नाव बदलता येते. आणि तुम्हाला जर जन्मतारीख बदलायचे असेल तर ती फक्त एकदा बदलता येते.

English Summary: aadhar update Published on: 26 June 2021, 01:53 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters