1. इतर बातम्या

Aadhar Card Update: आधार कार्डचा फोटो आवडत नाही का? मग; या पद्धतीने बदला आधारवरील फोटो

आधार कार्ड (Adhar Card) हे भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्वाचे दस्ताऐवज म्हणुन ओळखले जाते. हे एक महत्वाचे सरकारी ओळखपत्र आहे. आधार कार्ड हे सरकारी संस्था UIDAI द्वारे जारी केले जाते. मित्रांनो भारतात आधार कार्डशिवाय साधं एक सिम कार्ड देखील काढलं जाऊ शकत नाही.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
आधार कार्डवरील फोटो बदलायची प्रक्रिया

आधार कार्डवरील फोटो बदलायची प्रक्रिया

आधार कार्ड (Adhar Card) हे भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्वाचे दस्ताऐवज म्हणुन ओळखले जाते. हे एक महत्वाचे सरकारी ओळखपत्र आहे. आधार कार्ड हे सरकारी संस्था UIDAI द्वारे जारी केले जाते. मित्रांनो भारतात आधार कार्डशिवाय साधं एक सिम कार्ड देखील काढलं जाऊ शकत नाही.

याचा वापर बँकिंग कामापासून (Banking Sector) ते ओळखीच्या पुराव्यासाठी (Identity Proof) सर्वत्र केला जातो. आधार कार्ड हे सरकारी कामापासून (Government Work) ते गैरसरकारी कामापर्यंत सर्व ठिकाणी उपयोगात आणले जाते. आधार कार्डमध्ये कार्डधारकाची लोकसंख्याशास्त्रीय आणि बायोमेट्रिक माहिती असते.

आधार कार्ड महत्वाचे कागदपत्र असल्याने या कागदपत्रात लोकांना त्यांची माहिती अपडेट करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. मित्रांनो आधारकार्ड धारक आवश्यकतेनुसार आधार कार्डमध्ये त्यांचे तपशील अपडेट करू शकतात.

मात्र, यासाठी अटी व शर्ती आहेत. आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे कोणतीही व्यक्ती सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (SSUP) द्वारे माहिती अपडेट करू शकते.

याशिवाय दुसरा मार्ग म्हणजे आधार नोंदणी केंद्रावर जाऊन माहिती अपडेट करणे. मित्रांनो जर तुम्हाला आधार कार्डवरील फोटो आवडत नसेल तर आपण आधार नोंदणी केंद्रावर जाऊन आधार कार्डचा फोटो बदलू शकता. चला तर मग जाणुन घेऊया याविषयी सविस्तर.

या पद्धतीने बदला आधार कार्डवरील फोटो

»UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून 'आधार नोंदणी/सुधारणा/अपडेट फॉर्म' डाउनलोड करा.

»फॉर्म घ्या आणि तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्र/आधार सेवा केंद्राला भेट द्या.

»आधार केंद्रावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याकडे फॉर्म आणि तुमची बायोमेट्रिक माहिती सबमिट करा.

»येथे तुमचे थेट चित्र घेतले जाईल. तर, चांगली तयारी करा.

»अपडेटसाठी 100 रुपये शुल्क भरावे लागेल.

»पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) मिळेल आणि आधार पावती दिली जाईल.

»आधार अपडेट स्थिती जाणून घेण्यासाठी URN चा वापर केला जाऊ शकतो.

English Summary: Aadhar Card Update: Don't like Aadhar Card photo? Then; Change based photos with this method Published on: 25 May 2022, 10:00 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters