Aadhar Card : भारतात आधार कार्ड (Aadhar Card) हे एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्र (Government Document) आहे. याचा उपयोग भारतात सरकारी तसेच गैर सरकारी (Nongovernmental) कामात केला जातो.आधार कार्डविना भारतात साध एक सिम कार्ड देखील खरेदी करता येणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत आधार कार्डचा उपयोग (Aadhar Card Usage) तसेच महत्व भारतीय नागरिकांसाठी (Indian Citizens) किती आहे याचा अंदाज अगदी सहजरीत्या बांधता येऊ शकतो.
आजच्या काळात आधार कार्ड हे एक प्रमुख ओळखपत्र आहे, ज्याचा वापर बँक, आयकर रिटर्न भरण्यासाठी आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी केला जातो. सरकारने पॅनकार्डसोबत आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. मित्रांनो आधार कार्डच्या तुम्ही आधार कार्डच्या 12 अंकी क्रमांकाने तुमची बँक शिल्लक देखील तपासू शकता. मात्र यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
अशा प्रकारे आधारद्वारे बँक बॅलन्स तपासा
तुम्हाला तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासायची असेल, तर तुम्ही घरबसल्या आधार कार्डच्या मदतीने सहज शोधू शकता. यासाठी आवश्यक अट अशी आहे की तुमचे बँक खाते आणि मोबाईल क्रमांक तुमच्या आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
शिल्लक तपासण्यासाठी, सर्वप्रथम तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून *99*99*1# वर कॉल करा. यानंतर तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक टाकण्यास सांगितले जाईल. आधार क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर, UIDAI तुम्हाला एक संदेश पाठवेल ज्यामध्ये तुम्ही सहजपणे बँक शिल्लक तपासू शकता.
या लोकांसाठी फायदेशीर
आधार कार्ड क्रमांकाच्या मदतीने तुम्ही कोणत्याही एटीएम काउंटर किंवा बँकेच्या शाखेत न जाता तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासू शकता. जे लोक स्मार्टफोन वापरत नाहीत किंवा घरी बसून आधारवरून बॅलन्स तपासू इच्छितात त्यांच्यासाठी ही सुविधा खूप उपयुक्त आहे. याचा सर्वात मोठा फायदा त्या वृद्धांना होणार आहे जे इंटरनेट वापरत नाहीत.
आधार कार्डच्या इतर सुविधा
आधार कार्डद्वारे बँक बॅलन्स तपासण्यासोबतच तुम्ही अनेक सुविधांचा लाभही घेऊ शकता. आधार कार्डच्या मदतीने तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यातही पैसे पाठवू शकता. याशिवाय सरकारी अनुदानासाठी अर्ज करणे किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करणे हे आधार कार्डच्या मदतीने करता येते. तुमच्याकडे एटीएम कार्ड नसेल तर तुम्ही आधार केंद्रावर जाऊन आधार कार्डमधून पैसे काढू शकता.
Share your comments