1. इतर बातम्या

Aadhar Card : तुम्ही बघितलं का निळ्या कलरचे नवीन आधार कार्ड? जाणून घ्या कोणाला मिळतं हे आधार कार्ड

मित्रांनो जसे की आपणास ठाऊक आहे भारतात आधार कार्ड एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आता आधार कार्ड अगदी लहानग्यापासून ते वयस्क माणसापर्यंत सर्वांना अनिवार्य आहे. आधार कार्ड शिवाय भारतात साधं एक सिम देखील खरेदी करता येत नाही यावरून आपणास भारतात आधार कार्डचे महत्त्व लक्षात आले असेलच. पण मित्रांनो तुम्ही कधी निळ्या कलरचं आधार कार्ड बघितलं आहे का? नाही मग आम्ही आपणास सांगू इच्छितो की भारत सरकार ठराविक वयोगटातील व्यक्तींसाठी निळ्या कलरचे आधार कार्ड जारी करते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
blue aadhar card

blue aadhar card

मित्रांनो जसे की आपणास ठाऊक आहे भारतात आधार कार्ड एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आता आधार कार्ड अगदी लहानग्यापासून ते वयस्क माणसापर्यंत सर्वांना अनिवार्य आहे. आधार कार्ड शिवाय भारतात साधं एक सिम देखील खरेदी करता येत नाही यावरून आपणास भारतात आधार कार्डचे महत्त्व लक्षात आले असेलच. पण मित्रांनो  तुम्ही कधी निळ्या कलरचं आधार कार्ड बघितलं आहे का? नाही मग आम्ही आपणास सांगू इच्छितो की भारत सरकार ठराविक वयोगटातील व्यक्तींसाठी निळ्या कलरचे आधार कार्ड जारी करते.

आता तुम्ही म्हणत असाल नेमक्या कोणत्या वयोगटाला निळ्या कलरचे आधार कार्ड पुरविले जाते तर आम्ही सांगू इच्छितो निळ्या कलरचे आधार कार्ड लहानग्या मुलांसाठी बनवले जाते. ज्या मुलांचे वय पाच वर्षे व त्यापेक्षा कमी आहे अशा लहान मुलांसाठी निळ्या कलरचे आधार कार्ड भारत सरकारकडून जारी केले जाते. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, निळे आधार कार्ड बनवण्यासाठी मुलाच्या आई-वडिलांचे आधार कार्ड समवेतच मुलाचा जन्म दाखला या दोन कागदपत्रांची आवश्यकता भासत असते.

यूआईडीएआई या भारत सरकारच्या एका संस्थेत मार्फत भारतातील तमाम नागरिकांना आधार कार्ड दिले जाते. आधार कार्ड एक महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ते आवश्यक आहे. लहान मुलांना देखील याची आवश्यकता भासत असते यामुळे लहान मुलांना देखील यूआईडीएआई या संस्थेकडून आधार कार्ड पुरविले जाते. मित्रांनो लहान मुलांना आधार कार्ड दिले जाते ते आधार कार्ड बाल आधार म्हणून देखील ओळखली जाते. आज आपण या बाल आधार विषयी काही मूलभूत माहिती जाणून घेणार आहोत.

निळ्या रंगाच्या आधार कार्डविषयी काही महत्वाची माहिती 

निळ्या रंगाचे किंवा बाल आधार 12 अंकी नंबरसह येते. हे आधार 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बनवले जाते. मात्र हे आधार 5 वर्षांनी अवैध होते, 5 वर्षानंतर पुन्हा आधार अपडेट करावे लागते.

हे आधार अपडेट न केल्यास ते निष्क्रिय होते.  5 वर्षानंतर जेव्हा संबंधित मुलगा 15 वर्षांचा होतो तेव्हा पुन्हा बायोमेट्रिक अपडेट करावे लागते. UIDAI नुसार, मुलाचे 5 वर्षे पूर्ण झाल्यावर, त्याचे बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल. नवजात मुलाचे बोटांचे ठसे घेतले जात नाहीत.पण मूल 5 वर्षांचे झाल्यावर आधार अपडेट करावा लागेल

बाल आधार कार्ड बनवण्याची प्रक्रिया

यासाठी मुलाला आधार नावनोंदणी केंद्रात घेऊन जावे लागेल तेथे, नावनोंदणीसाठी फॉर्म भरून सबमिट करावा लागेल. कागदपत्र म्हणून पालकाला त्याचे आधार कार्ड द्यावे लागेल.  याशिवाय मोबाईल नंबर देखील द्यावा लागेल ज्या अंतर्गत निळे आधार कार्ड जारी केले जाईल. निळ्या आधारमध्ये बायोमेट्रिक माहिती आवश्यक नसते, फक्त एक फोटो क्लिक केला जाईल. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर एक संदेश येतो. पडताळणीच्या 60 दिवसांच्या संबंधित मुलाला ब्लू आधार कार्ड जारी केले जाईल.

महत्वाच्या बातम्या :

Watermelon : शेतकऱ्यांवर संकटाची मालिका कायम!! टरबूज पिकाला कवडीमोल दर मिळतं असल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत

मालेगावच्या पठ्ठ्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग!! बिया नसलेल्या कलिंगडाची लागवड अन परदेशी पाहुण्यांची बांधावर हजेरी

English Summary: Aadhar Card: Have you seen the new blue Aadhar Card? Find out who gets this Aadhar card Published on: 29 April 2022, 01:07 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters