दिल्ली : आधार कार्ड मध्ये नेहमी नवीन बदल येत असतात. आता आधार कार्ड मध्ये नवीन बदल झाला आहे. बाजारात बनविलेले आधारचे स्मार्ट कार्ड अवैध असून, हे कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही. 'युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया' (यूआयडीएआय) यांनी असे स्पष्टीकरण आधार कार्ड बनविणाऱ्या म्हणजे आधार प्राधिकरणाला दिले आहेत.
'युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया' (यूआयडीएआय) यांनी समाजमाध्यमांत एक पोस्ट जरी केली आहे. यामध्ये म्हटले आहे कि, आधार नोंदणी केल्यानंतर लोक बाजारातून पीव्हीसी आधार कार्ड बनवून घेतात. अशी कार्डे आता चालणार नाहीत, असे आधार प्राधिकरणाने म्हटले आहे. लोक बाजारातून पीव्हीसी आधार कार्ड बनवून घेतात, मध्ये आधारच्या स्मार्ट कार्डांत अनेक सुरक्षाविषयक उणिवा असतात. या कार्डांत कोणतेच सुरक्षाविषयक फिचर नसते. त्यामुळे अशा कार्डांना आम्ही अवैध घोषित करीत आहोत, असे 'युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया' म्हटले आहे.
असे मिळवा मूळ कार्ड
1. 'युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया' प्रधिकरणाने म्हटले की, मूळ आधार कार्ड प्राधिकरणाच्या https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाइटच्या मदतीने प्राप्त करू शकता.
2. साइटवर गेल्यानंतर 'ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड' या पर्यायावर क्लिक करा.
3. १२ अंकी आधार क्रमांक अथवा २८ अंकी नोंदणी आयटी टाका. सुरक्षा कोड भरा.
4. त्यानंतर तुमच्या मोबाइलवर ओटीपी येईल. त्यानंतर अटी व शर्ती स्वीकृत करा.
5. ओटीपी पडताळणीस सबमिट बटन दाबल्यानंतर 'पेमेंट ऑप्शन' दिसेल.
6. तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंग याद्वारे पैसे भरू शकता.
7. पैसे अदा झाल्यानंतर पावती मिळेल आणि कार्ड पोस्टाने घरपोच येईल.
मूळ कार्डावर असतात हे फिचर्स
1. कार्ड जारी केल्याची व प्रिंट केल्याची तारीख
2. होलोग्राम
3. सुरक्षित क्यूआर कोड
4. माइक्रो टेक्स्ट
पीव्हीसी कार्ड हवे
1. केवळ ५० रुपये भरून आपण अधिकृतरीत्या आधारचे पीव्हीसी कार्ड मिळवू शकता.
2. आधार कार्ड प्राधिकरणाकडून पोस्टाने पाठविले जाईल.
3. मूळ आधार पीव्हीसी कार्डात डिजिटली साईनड् सुरक्षित क्यूआर कोड असतो. ते छायाचित्रासह येते.
4. त्यामध्ये लोकसांख्यिकी तपशील (डेमाॅग्राफिक डिटेल्स) असतो, तसेच सर्व सुरक्षा फिचरही त्यात असतात.
Share your comments