8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातत्याने चांगली बातमी येत आहे. 8 व्या वेतन आयोगाबाबतही नवीन बातमी आली आहे. आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या पगारात नव्या सूत्राने वाढ होणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 2016 मध्ये लागू करण्यात आल्या. आता त्या घटनेला ६ वर्षे उलटून गेली आहेत. आता अशी चर्चा आहे की, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार निश्चित करण्यासाठी 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा विचार नाही. मात्र, नव्या फॉर्म्युल्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार दरवर्षी निश्चित होणार आहेत. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
पंकज चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे पगार, भत्ते आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार 8 व्या वेतन आयोगापेक्षा काहीतरी वेगळा विचार करत आहे.
मात्र 8 व्या वेतन आयोगावर अद्याप कोणताही विचार केला जात नाही. ते म्हणाले की, केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतनाचा आढावा घेण्यासाठी वेतन आयोग स्थापन करण्याची गरज भासू नये.
EPF ची दोन्ही खाती अशा प्रकारे करा एकत्र, जाऊन घ्या सोपी पद्धत..
नवीन फॉर्म्युला काय आहे यावर राज्यमंत्र्यांनी चर्चा केली
केंद्रीय कर्मचार्यांच्या पगारवाढीबाबत ज्या नवीन फॉर्म्युल्याची चर्चा होत आहे, ते म्हणजे आयक्रोयड फॉर्म्युला. या सूत्रामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन महागाई, राहणीमानाचा खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीशी निगडीत असेल. या सर्व गोष्टींचे मूल्यांकन केल्यानंतरच पगार वाढेल.
सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना याचा फायदा होताना दिसेल. मात्र, अर्थमंत्रालयातील एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, ही सूचना चांगली आहे, मात्र आतापर्यंत अशा कोणत्याही सूत्राचा विचार करण्यात आलेला नाही. आठवा वेतन आयोगही कधी येईल, याचा काही पत्ता नाही.
7th Pay Commission: खुशखबर! या महिन्यात वाढणार महागाई भत्ता! सरकारने घेतला मोठा निर्णय
दरवर्षी पगार वाढणार!
केंद्र सरकारने 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 7,000 रुपयांवरून 18,000 रुपये केले होते. न्यायमूर्ती माथूर यांनी शिफारशीत म्हटले होते की, सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराचा दरवर्षी किंमत निर्देशांकानुसार आढावा घ्यावा. केंद्र सरकारकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नसले तरी 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.
शेतकऱ्यांना वृद्धपकाळात ही योजना बनणार आधार! मिळणार ३६ हजार रुपये; असा करा अर्ज...
Share your comments