7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) चा जूनचा डेटा आला आहे. ज्यामध्ये 0.2 अंकांची वाढ झाली आहे. हा आकडा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरवण्यात मदत करतो. त्यानुसार यावेळी डीएमध्ये ४ टक्के वाढ होऊ शकते.
सप्टेंबरमध्ये याची घोषणा होऊ शकते. एजी ऑफिस ब्रदरहुड, प्रयागराज आणि महागाई भत्ता (dearness allowance) कॅल्क्युलेटरचे माजी अध्यक्ष हरी शंकर तिवारी यांच्या मते, एआयसीपीआयच्या जानेवारी ते जूनपर्यंतच्या आकडेवारीवरून महागाई भत्त्यात वाढ झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना यावेळी 4 टक्के महागाई भत्त्यात वाढ मिळणार आहे.
हे ही वाचा: Common People: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; 1 ऑगस्टपासून होणार हे 5 मोठे बदल
वाढीची घोषणा सप्टेंबरमध्ये होऊ शकते
एजी ऑफिस ब्रदरहुड प्रयागराजचे माजी अध्यक्ष हरिशंकर तिवारी म्हणाले की, यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याचा विचार केला जात आहे, ज्याची घोषणा नवरात्रीच्या आसपास सप्टेंबरमध्ये (September) केली जाऊ शकते. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला तर तो 38 टक्के होईल.
याआधी जानेवारीमध्ये त्यात 3 टक्क्यांनी वाढ होऊन ती 34 टक्के झाली होती. ही वाढ सातव्या वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असेल. केंद्र सरकारच्या अंतर्गत 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी कार्यरत आहेत, तर 65 लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारक आहेत.
हे ही वाचा: Good News: ओक्केच! खासगी कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून ४ दिवस काम, ३ दिवस सुट्टी!
पगारात किती वाढ होणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे (Central employees) सातव्या वेतनश्रेणीनुसार किमान मूळ वेतन 18 हजार रुपये प्रति महिना आहे. डीएमध्ये 4 टक्के वाढ म्हणजे प्रत्येक महिन्याला 6,840 रुपये महागाई भत्ता म्हणून उपलब्ध होतील. म्हणजेच कर्मचाऱ्यांना महिन्याला किमान 720 रुपयांचा लाभ मिळणार आहे. जर आपण वर्षात पाहिले तर त्यांना 8,640 रुपये नफा झाला आहे.
हे ही वाचा: 7th pay commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार रक्षाबंधनापूर्वी देणार मोठी भेट! करणार 'या' घोषणा..
Share your comments