7th Pay Commission: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगाराबाबत मोदी सरकारकडून एक मोठी अपडेट आली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत वाढ करण्याबाबत सरकारने राज्यसभेत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत यासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.
महागाई भत्ता (DA) केंद्र सरकारी कर्मचारी/पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत (DR) महागाई संबंधित घाऊक किंमत निर्देशांकाच्या (WPI) आधारावर मोजली जात नाही.
कामगार व रोजगार मंत्रालयाने जारी केलेल्या औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक (AICPI-IW) नुसार महागाई दराच्या आधारावर केंद्र सरकारी कर्मचारी/पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता/महागाई सवलतीची गणना केली जाते.
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन भेट; डीएमध्ये 'एवढी' टक्केवारी निश्चित!
महागाई भत्ता म्हणजे काय?
महागाई भत्ता म्हणजे सरकार आपल्या पेन्शनधारकांना, कर्मचार्यांना, कर्मचार्यांच्या मूळ पगाराच्या टक्केवारीनुसार महागाईचा प्रभाव संतुलित करण्यासाठी देते. जानेवारी आणि जुलैमध्ये गणना वर्षातून दोनदा केली जाते. DA शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागानुसार बदलतो. वाढत्या महागाईमुळे त्यात वाढ करावी लागणार आहे.
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार नव्या सूत्राने वाढणार! सरकारचा मोठा निर्णय
Share your comments