7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांवर खुश झाले आहे. नवरात्रीच्या दिवशी महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केल्यानंतर आता केंद्रीय कामगार मंत्रालयाने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बदलत्या महागाई भत्त्यात (व्हेरिएबल डीए) वाढ भेट दिली आहे. परिवर्तनीय महागाई भत्त्यात वाढ 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू झाली आहे.
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या या घोषणेमुळे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ होणार आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या 19 जानेवारी 2017 च्या अधिसूचनेला लक्षात घेऊन, कामगार मंत्रालयाने परिवर्तनीय महागाई भत्त्यात वाढ केली आहे.
हेही वाचा: EPFO: दिवाळीपूर्वी खात्यात येणार पीएफचे व्याज, जाणून घ्या बॅलन्स कसा तपासायचा..
सातव्या वेतन आयोगानुसार, 38 टक्के महागाई भत्त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता आणि शहर भत्ताही वाढणार आहे. यासोबतच भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीही आपोआप वाढतील.
केंद्रीय कर्मचार्यांचा मासिक पीएफ आणि ग्रॅच्युइटी मूळ वेतन आणि डीएमधून मोजली जाते. अशा परिस्थितीत डीए वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युइटीही वाढण्याची खात्री आहे.
इतकेच नाही तर डीए वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता (HRA)ही वाढणार आहे. ही वाढ ३ टक्क्यांपर्यंत असू शकते, असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा: iPhone 14 Plus वर बंपर ऑफर! 22 हजार रुपयांपेक्षा जास्त मिळतीय सूट, असा घ्या लाभ...
28 सप्टेंबर 2022 रोजी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 4 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ३४ वरून ३८ टक्के झाला आहे.
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता 38 टक्के दराने DA आणि DR मिळत आहे. केंद्र सरकारच्या या घोषणेचा थेट फायदा 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना झाला आहे.
हेही वाचा: आनंदाची बातमी! या दिवाळीत अर्ध्या किंमतीत मिळणार ट्रॅक्टर; असा घ्या लाभ
Share your comments