नवी मुंबई: सध्या मोदी सरकार (Modi Government) केंद्रीय कर्मचारी (Central Government Employee) आणि पेन्शनधारकांवर मेहरबान असल्याचे बघायला मिळतं आहे. सध्या सर्वत्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी बाबत चर्चा जोरात सुरू आहे. केंद्र सरकार आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ करणार असून, यामुळे कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, सरकार आता लवकरच महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करणार आहे. यानंतर, महागाई भत्ता 34 वरून 38 टक्क्यांपर्यंत वाढेल, म्हणजेच पगारात बंपर वाढ नोंदवली जाईल. निश्चितचं यामुळे सरकारी नोकरदार मालामाल होणार असल्याचे सांगितले जातं आहे.
केंद्र सरकारच्या सूत्रांनुसार, 1 जुलै 2022 पासून कर्मचाऱ्यांचा डीए (DA) आणि पेन्शनधारकांचा डीआर (DR) 4 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.
सरकारने अद्याप अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु काही प्रसारमाध्यमांनी असा दावा केला आहे. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) च्या आधारे जुलैमध्ये सरकार DA 4 टक्क्यांनी वाढवू शकते असे सांगण्यात येत आहे.
एआयसीपी इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात हा आकडा 125.1 होता, तर फेब्रुवारीमध्ये तो 125 वर होता. याशिवाय मार्चबद्दल बोलायचे झाले तर या महिन्यात ती वाढून 126 झाली आहे.
महागाई भत्ता वाढल्यानंतर मिळणार एवढा पगार
महागाई भत्ता 38 टक्के झाल्यानंतर 18 हजार मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना 6 हजार 840 रुपये डीए मिळेल. या कर्मचाऱ्यांना सध्या 34% डीएनुसार 6 हजार 120 रुपये मिळत आहेत. म्हणजेच त्यांचा मासिक पगार 720 रुपयांनी वाढणार आहे. अशा प्रकारे वार्षिक पगारात 8,640 रुपयांची वाढ होणार आहे.
पगार दरवर्षी इतक्या हजारांनी वाढे
जर महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांनी वाढला तर पगारात बंपर वाढ होईल. ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56,900 रुपये आहे, 38 टक्के महागाई भत्ता असेल तर त्यांना 21,622 रुपये डीए मिळेल. सध्या 34 टक्के डीएनुसार अशा कर्मचाऱ्यांना 19,346 रुपये मिळत आहेत, त्यामुळे त्यांच्या मासिक पगारात 2,276 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच वार्षिक पगार 27312 रुपयांनी वाढणार आहे.
Share your comments