1. इतर बातम्या

7th pay commission: 18 महिन्यांची डीएची थकबाकी मिळण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; जाणून घ्या पत्रातील तपशील..

7th pay commission: सातव्या वेतन आयोगांतर्गत, पेन्शनधारक आणि केंद्रीय कर्मचार्‍यांना 18 महिन्यांचा स्थगित महागाई भत्ता लवकरच मिळू शकेल, कारण पेन्शनर्स फोरमने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 18 महिन्यांची डीएची थकबाकी मिळण्यासाठी पत्र लिहिले आहे.

7th pay commission

7th pay commission

7th pay commission: सातव्या वेतन आयोगांतर्गत, पेन्शनधारक आणि केंद्रीय कर्मचार्‍यांना (central employees) 18 महिन्यांचा स्थगित महागाई भत्ता लवकरच मिळू शकेल, कारण पेन्शनर्स फोरमने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना 18 महिन्यांची डीएची थकबाकी मिळण्यासाठी पत्र लिहिले आहे.

इंडियन पेन्शनर्स फोरमने (Indian Pensioners Forum) यांनी या पत्राव्दारे पंतप्रधान मोदींना या समस्येवर काहीतरी तोडगा काढण्यास सांगितले आहे. 18 महिन्यांची थकबाकी ही मोठी रक्कम असून त्यांच्यासाठी उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत असल्याचेही सांगण्यात आले आहे. डीएची (DA) थकबाकी ठेवणे योग्य नाही, असे त्यांनी पत्रात ठणकावून सांगितले आहे.

जर पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप केला आणि 18 महिन्यांची थकबाकी दिली, तर देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांच्या खात्यात मोठी रक्कम येईल.

7th Pay Commission: अजून फक्त 11 दिवस! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात २७ हजार रुपयांची वाढ; मोदी सरकार करणार घोषणा

तुम्हाला किती मिळेल

केंद्र सरकारने (Central Govt) कर्मचाऱ्यांना थकबाकीदार डीए दिल्यास कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम येईल. 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत रोखलेली DA ची रक्कम 2 लाख 18 हजार रुपयांपर्यंत असू शकते. AICPI डेटावर नजर टाकल्यास असे दिसून येते की, यावेळी DA 3 ते 5 टक्क्यांनी वाढू शकतो. म्हणजेच या वाढीमुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३७ ते ३९ टक्के होऊ शकतो.

बाप रे बाप! बाजारपेठेत मटनापेक्षा महाग मशरूम; जंगली मशरूमची होतेय चर्चा

विशेष म्हणजे कोविड महामारीमुळे केंद्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा सुमारे १८ महिन्यांचा डीए बंद केला होता. केंद्र सरकारने 1 जुलै 2021 आणि फेब्रुवारी 2022 दरम्यान महागाई भत्त्यात वाढ केली होती, ज्याला सध्या 34 टक्के डीए मिळत आहे. त्याचवेळी, ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा डीए वाढण्याची शक्यता आहे. याचा फायदा 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

शेतकऱ्यांनो मालामाल होयचंय ना? तर करा ही शेती आणि कमवा लाखों

English Summary: 7th pay commission: Direct letter to Prime Minister Narendra Modi to get DA arrears of 18 months Published on: 24 July 2022, 01:30 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters