7th Pay Commission: केंद्र सरकारकडून (Central Goverment) कर्मचाऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले जातात. वाढत्या महागाईत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे (central employees) जीवनमान सुधारावे यासाठी सरकारकडून वर्षातून २ वेळा महागाई भत्ता (DA) वाढवण्यात येतो. मात्र यावर्षी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला असल्याच्या बातम्या आल्या होत्या पण सरकारने असा कोणताही निर्णय न घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनेक राज्य सरकारांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सणापूर्वी महागाई भत्ता वाढवून भेटवस्तू दिल्या आहेत. मात्र केंद्र सरकारचे कर्मचारी अद्यापही महागाई भत्त्याच्या (DA increase) प्रतीक्षेत आहेत. असे म्हटले जात आहे की सरकार सप्टेंबरच्या सुरुवातीला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते.
मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र, आठवा वेतन आयोग तूर्तास येणार नसल्याचे सरकारने निश्चितपणे स्पष्ट केले आहे.
मार्चमध्ये डीए वाढवण्यात आला होता
सरकार दर सहा महिन्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात बदल करते. मागच्या वेळी सरकारने मार्च 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती. यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के करण्यात आला. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३४ टक्के दराने डीए दिला जात आहे.
Buffalo Farming: आता वाहणार दुधाची गंगा! या 4 जातींच्या म्हशी देतायेत 600 ते 1300 लिटर दूध...
बदल दर सहा महिन्यांनी होतो
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढवू शकते. पण हे कधी होणार, यावर सरकारने काहीही सांगितलेले नाही. कारण मार्चमध्ये डीए वाढवून सहा महिने पूर्ण होणार आहेत.
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी नुकतेच लोकसभेत सांगितले होते की, औद्योगिक कामगारांसाठीच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (ACIPI) आधारावर महागाई दर मोजला जातो. या आधारावर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी बदलला जातो.
यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा शिंदे गट की ठाकरे गट घेणार? फडणवीस म्हणाले...
पगार किती वाढणार?
गणनेनुसार सरकारने कर्मचाऱ्यांचा डीए ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के केला तर पगारात मोठी वाढ होईल. सध्या एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये असल्यास. 34 टक्के दराने, महागाई भत्ता 6,120 रुपये होतो. चार टक्क्यांनी वाढ झाल्यास डीए ६,८४० रुपये होईल.
अद्याप कोणतेही अधिकृत विधान नाही
सध्याचे महागाईचे आकडे लक्षात घेऊन सरकारने डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ केल्यास ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल. सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेला डीए हा त्यांच्या आर्थिक सहाय्य वेतन संरचनेचा भाग आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए सरकार कधी वाढवणार? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार सप्टेंबरमध्ये डीए वाढवण्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते.
महत्वाच्या बातम्या:
"महाराष्ट्राच्या धर्तीवर खोके हराम नावाची संघटना, त्यात बोकेही आहेत"
LIC scheme: 10 लाखांची गुंतवणूक देईल 35 लाख रुपयांचा नफा; अशी करा गुंतवणूक...
Share your comments