7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात एकवेळ 9 रुपयांची वाढ होऊ शकते. वृत्तानुसार, नवीन वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात केंद्र सरकार 52 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करू शकते.
वृत्तानुसार, पुढील वर्षी 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर होणार्या अर्थसंकल्पानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सरकार निर्णय घेऊ शकते. विशेष म्हणजे फिटमेंट फॅक्टर अंतर्गत मूळ पगार वाढतो. किंबहुना, केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून केंद्र सरकारकडे फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत.
कर्मचार्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये होणार वाढ! सरकारने घेतला मोठा निर्णय!
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के दराने फिटमेंट फॅक्टर दिला जात आहे. त्यात 3.68 पट वाढ करण्याची मागणी होत आहे. फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 पर्यंत वाढल्याने, किमान मूळ वेतन 18,000 वरून 26,000 रुपये होईल. केंद्र सरकारने ही मागणी मान्य केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात प्रचंड वाढ होणार आहे.
विशेष म्हणजे, गेल्या वेळी 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टर वाढवण्यात आला होता. त्याच वर्षी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे किमान पगार थेट ६००० रुपयांवरून १८,००० रुपयांवर गेले.
तर कमाल मर्यादा 90,000 रुपयांवरून 2.5 लाख रुपये करण्यात आली. आता सरकार या वर्षी पुन्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करू शकते.
भारताची जैव अर्थव्यवस्था गेल्या 8 वर्षांत 8 पटींनी वाढली : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
फिटमेंट फॅक्टर सर्व केंद्रीय सरकारी कर्मचार्यांचे मूळ वेतन निर्धारित करते. यावेळी, फिटमेंट फॅक्टरमध्ये संभाव्य वाढ झाल्यास, किमान मूळ वेतन 18000 रुपयांवरून 26000 रुपये होईल.
"नैसर्गिक पद्धतीनं शेती केल्यास खर्च कमी होतोच; शिवाय उत्पादनाला अधिक चांगला भाव मिळतो"
Share your comments