1. इतर बातम्या

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ; 'या' दिवसापासून लागू होणार

7th Pay Commission: अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. रक्षाबंधनापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी बातमी मिळाली आहे. सरकारने महागाई भत्ता (7th Pay Commission) 4% ने वाढवला आहे.

7th Pay Commission

7th Pay Commission

7th Pay Commission: अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. रक्षाबंधनापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी बातमी मिळाली आहे. सरकारने महागाई भत्ता (7th Pay Commission) 4% ने वाढवला आहे.

जूनमधील ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स इंडस्ट्रियल वर्कर्स (AICPI) डेटा समोर आल्यानंतर, महागाई भत्त्यात चांगली वाढ होणार हे निश्चित होते. मात्र, आता त्याची घोषणा करण्यात आली आहे.

महागाई भत्ता ३८ टक्क्यांवर

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4% वाढ झाली आहे. सरकारने ही घोषणा केली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, DA मधील वाढ AICPI च्या डेटावर अवलंबून आहे. AICPI-IW (ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स- इंडस्ट्रियल वर्कर) च्या पहिल्या सहामाहीची आकडेवारी जाहीर झाली आहे.

यामध्ये निर्देशांकानुसार आता नवीन आकडा 0.2 अंकांनी वाढून 129.2 वर पोहोचला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

7th pay commission: PM मोदी आज DA वाढवण्याची घोषणा करणार; जाणून घ्या किती वाढणार पगार

38% DA चे पैसे कधी येणार?

महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता ३८ टक्के झाला आहे, त्याआधी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्के होता. महागाई भत्ता सप्टेंबर २०२२ च्या पगारात दिला जाईल, तर वाढीव डीए जुलैपासून लागू झाला आहे.

म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या थकबाकीचे पैसेही कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार आहेत. एकूणच सणासुदीच्या काळात डीएच्या थकबाकीसह कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम येणार आहे. आता जाणून घेऊया कर्मचाऱ्यांच्या खात्यात किती पगार येणार?

नोकरी काय करताय? हा व्यवसाय करा आणि बना करोडोंचे मालक; जाणून घ्या...

कमाल मूळ पगाराची गणना

1. कर्मचार्‍यांचे मूळ वेतन रु 56,900
2. नवीन महागाई भत्ता (38%) रुपये 21,622/महिना
3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) रु.19,346/महिना
4. महागाई भत्त्यात 21,622-19,346 ने किती वाढ झाली = रु 2260/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 2260 X12 = रु. 27,120

किमान मूळ पगाराची गणना

1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन रु. 18,000
2. नवीन महागाई भत्ता (38%) रु.6840/महिना
3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) रु.6120/महिना
4. किती महागाई भत्ता वाढला 6840-6120 = रु.1080/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 720 X12 = रु 8640

PM Kisan: शेतकऱ्यांचे अच्छे दिन! 12व्या हप्त्यात 2000 ऐवजी मिळणार 4000 रुपये; जाणून घ्या कसे

English Summary: 7th Pay Commission: 4 percent increase in dearness allowance of central employees Published on: 04 August 2022, 10:39 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters