Spectrum Auction:सोमवारी भारताच्या इतिहासातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा स्पेक्ट्रमचा लिलाव झाला. हा लिलाव तब्बल सात दिवस चालला व या लिलावाच्या माध्यमातून दीड लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक 5जी दूरसंचार स्पेक्ट्रम ची विक्रमी विक्री झाली. या झालेल्या महालिलावामध्ये मुकेश अंबानी यांच्या जिओने आपले आघाडीचे स्थान मजबूत करण्यासाठी सर्वाधिक बोली लावली व दुसऱ्या क्रमांकावर एअरटेल राहिले.
यामध्ये दीड कोटी रुपयांच्या बोली लावल्या गेल्या.5 जी हे हाय स्पीड मोबाईल इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी सक्षम असलेल्या स्पेक्ट्रमची लिलावाच्या रक्कम गेल्या वर्षीचा विचार केला तर 77 हजार 815 कोटी रुपयांच्या 4जी स्पेक्ट्रम च्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे.
ग्राहकांना याचा काय होईल फायदा?
1- देशामध्ये आता 5जी तंत्रज्ञान अवतरणार असून हे ग्राहकांसाठी एक आकर्षक असा अनुभव घेऊन येईल.
2- यामुळे आता देशातल्या कोणत्याही कोपर्यात किंवा कोणत्याही ठिकाणी असलेल्या व्यक्तीला इंटरनेट कनेक्टिव्हिटी अतिशय सहजरित्या मिळेल.
3- इंटरनेट स्पीड वाढल्यामुळे शिक्षण तसेच आरोग्य क्षेत्रासह इतर सेवांवर दूरगामी सकारात्मक परिणाम होईल.
4- बफरिंग होण्यापासून सुटका मिळेल. याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला दोन जीबीचा एखादा मूव्ही म्हणजे चित्रपट डाऊनलोड करायचा असेल तर तो अवघ्या 20 ते 25 सेकंदामध्ये डाउनलोड करता येईल.
या वर्षाच्या अखेरपर्यंत देशात 5 जी
या झालेल्या महालिलावामध्ये जी कंपनी लिलाव जिंकलेली आहे या कंपनीला 5जीचा परवाना मिळेल. आणि हा परवाना संबंधित कंपनीसाठी वीस वर्ष वैध राहील. सर्व प्रक्रिया अगदी सुरळीत झाली तर देशात या वर्षाच्या शेवटी शेवटी 5जी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
Share your comments