Maharashtra Government: शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde- Fadnavis Government) कर्मचाऱ्यांना एक आनंदवार्ता दिली आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांबाबत शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 34 टक्के झाला आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना आनंद झाला आहे.
यासंदर्भात राज्य सरकारने एसटी महामंडळाला अधिकृत पत्र देखील पाठवले आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे एसटी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना देखील 34 टक्के महागाई भत्ता मिळावा यासाठी एसटी कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या होत्या. याबाबत या संघटना वारंवर सरकारकडे मागणी करत पाठपुरावा करत होत्या. त्यासोबत या संघटनांनी सरकारला आंदोलन करण्याचा देखील इशारा दिला होता.
मोठी बातमी! मंत्रालयामध्ये तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; 'हे' आहे धक्कादायक कारण
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. पण एसटी कर्मचाऱ्यां मात्र 28 टक्के टक्के महागाई भत्ता मिळत होता.
या एसटी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित 6 टक्के महागाई भत्ता मिळावा म्हणून एसटी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सलग तीन वेळा भेट घेतली होती. या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांनी महागाई भत्त्यात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! निम्याचं किमतीत मिळणारं ट्रॅक्टर
34 टक्के महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाने अधीकृत पत्र महामंडळात पाठवले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसटी कर्मचारी संघटना आणि राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी सरकारचे आभार मानले आहे.
गावात हे तीन व्यवसाय जबरदस्त चालतात; सुरु करा व्यवसाय आणि मिळवा लाखों रुपये
Share your comments