बदलत्या काळानुसार वाढीव उत्पादनावर भर दिला जात आहे. नागरिकांची मागणी काय आहे याचा अभ्यास करून नागरिक वर्गाला मागणी नुसार पुरवठा करून अगदी कमी कालावधीत "झामा ऑरगॅनिक्स" ने देशात आपले जाळे बनवले आहे. स्वच्छ व टिकाऊ माल मुंबई मध्ये देणे याची सुरुवात झामा ऑरगॅनिक्सने केली.
देशामध्ये सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात जाळे तयार करणे :
पुण्यातील नागरिकांचा वाढता प्रतिसाद बघता तिथे उत्पादन देताना मुंबई मध्ये सुद्धा सेंद्रिय वस्तू देण्यात आल्या त्यामुळे २०० पेक्षा जास्त ग्राहकांची भर पडली. सध्या या कंपनीचा एक उद्देश आहे की सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे जाळे उभा करून नागरिकांना अधिका अधिक सेंद्रिय शेती माल पोचवायचा त्यामुळे त्यांना पण याचा उपभोग घेता येईल.धान्य, डाळी, मसाले, वाळलेल्या औषधी वनस्पती, बेदाणे, तेल, साखर अशी पॅकेज केलेली किराने उत्पादने तर पोर्टलद्वारे व इकोमर्स उपलब्ध आहेत. देशामध्ये सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात जाळे तयार करण्याचे उद्दिष्ट नहेता यांचे आहे.भारतामध्ये ५० हजार पेक्षा जास्त प्रमाणात सेंद्रिय शेतकऱ्यांचे जाळे असलेल्या झामा ऑरगॅनिक्स ने मुंबई मध्ये सेंद्रिय तसेच टिकाऊ माल पोहचवला आहे.
झामा’च्या वाढत्या विस्ताराची काय आहेत कारणे:-
२०१६ साली सुरू झालेल्या झामा ऑरगॅनिक्स चा २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय संबध आला. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिस येथून नेहता यांनी पदवी घेऊन आपल्या बहिणी सोबत आणि व्यवसायिक जोडीदार सोबर प्रवास चालू केला. ते आपल्या रेस्टॉरंट साठी फॉरगेज उत्पादने मिळवण्यासाठी देशभर फिरत होते पण भारत हा असा देश आहे जो जगात सर्वाधिक जास्त सेंद्रिय शेती करतो त्यामुळे या शेतीबद्धल खात्री वाढली. नेहता सांगतात की झामा ऑरगॅनिक्स ची स्थापना करण्यामागे या बाजारपेठेची महत्वाची भूमिका आहे. हळूहळू जाळे देशभर वाढत गेले आणि विस्तार होऊ लागला.
उत्पादकच ठरवतात शेतीमालाचा दर:-
उत्पादकांना च उत्पादनाचे दर ठरविण्याची परवानगी असते. किमंत निश्चित करताना आम्ही किमंत बद्दलण्यावर आमचा ढोबळ अंदाज व्यक्त करत असतो. सेंद्रिय उत्पादने शेल्फ लाईफसह येतात तसेच भाज्या व फळे यांची कापणी केली जाते जे की झामा दोन वेळा शेतीमाल तपासून पाहते. पहिली तपासणी ही शेतीवर केली जाते तर दुसरी तपासणी ऑर्डर चे पॅकेज करण्याआधी गोदामात केली जाते.
Share your comments