यूट्यूब म्हणजे जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पैकी एक आहे. जिथे रोज लाखो व्हिडीओ अपलोड होत असतात. नवनवीन आणि वेगवेगळे अनुभव देण्यासाठी हे Youtube युजर्ससाठी अनेक फीचर्स आणत असते. यूट्यूबने अलीकडेच अनेक फिचर्सची घोषणा केली आहे.जर तुम्हाला अजूनही नवीन अपडेटमध्ये काही खास
नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या नसतील तर तुम्हाला यूट्यूबचं नवीन रूप टप्प्याटप्प्याने पाहायला मिळणार आहे.The new look of YouTube will be seen in phases.
बळींचे राज्य आले पण बळीराजाचे राज्य येईल !
आता बदललेल्या यूजर इंटरफेसमध्ये नवीन बटनांसोबत यूजर्सना पिंच-टू-झूम आणि डार्क मोड सपोर्ट मिळणार आहे. याशिवाय सर्व युजर्सना या नवीन इंटरफेसमध्ये ॲम्बियंट मोड आणि युनिक हँडल यांसारखे नवीन फीचर्ससुद्धा मिळणार आहे.
युट्यूबच्या दिलेल्या माहीतीनुसार, नवीन इंटरफेसमध्ये एकापेक्षा अधिक बटने दिली आहे. याशिवाय यूजर्सना आता त्यांच्या इंटरफेसमध्ये शेअर आणि डाऊनलोड बटणांसाठीही सपोर्ट मिळेल. सबस्क्राईब बटणाला नवीन आकार आणि रंग मिळणार आहे. याशिवाय व्हिडीओच्या Description मध्ये जर कोणत्या लिंक्स टाकल्या असतील तर त्या YouTube लिंक्स बटनांमध्ये बदलतील आणि लाईक, शेअर आणि डाउनलोड वारंवार करता येणार आहे.
डायनॅमिक कलर सॅम्पलिंगचा (बॅकग्राउंड कलर व्हिडीओसोबत जुळेल) वापर केल्याचे देखील युट्यूबने सांगितलं आहे. कंपनीच्या मते जर यूट्युब यूजर जेव्हा अंधाऱ्या ठिकाणी किंवा खोलीत असेल आणि तो व्हिडीओ कंटेंट पाहत असेल तर तेव्हा हे डिझाइन कंटेंटवर लक्ष केंद्रित करून उत्तम अनुभव देईल. हा मोड मोबाईल आणि डेस्कटॉप युजर्स असा दोन्हीसाठी डार्क थीममध्ये उपलब्ध असणार आहे.
Share your comments