जो पर्यंत समृद्ध शेतकरी, निर्व्यसनी युवापिढी चा हातभार देशाच्या विकासाला लागणार नाही तो पर्यंत आपण महासत्तेची स्वप्नच रंगवू शकतो प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रगतशील शेतकरी, निर्व्यसनी भावी पिढीची गरज आहे,काही काळापासून उत्सव साजरा करतांना नशापानी करण्याचा ट्रेंड खूपच वाढल्याने देशाचं भविष्य नशेच्या आहारी जात असल्याचे भयावह चित्र डोळ्यांनी पाहत असत्तांना देश महासत्ता होईल का हा यक्ष प्रश्न समोर उभा राहतो, आपल्या जीवनाचे अमूल्य क्षण व्हॉट्स ॲप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम पब्जी, तीनपत्ती चा वापर करून इंटरनेट च्या जाळ्यात गुरफटलेली तरुण पिढी
स्वप्नांच्या मोहजळात अडकून पडल्याने वास्तविक आयुष जगण्याची इच्छाच राहिली नाही Trapped in the illusion of dreams, there is no desire to live the real AYUSH, अश्यातच फुकटच्या दारू पासून सुरुवात केलेले तरुण आता व्यसनाधीनतेकडे वळत असल्याने ही चिंतेची बाब केवळ त्या युवापिढी च्या कुटुंबीयांची नसून प्रत्येक भारतीय नागरिकांची समस्या व त्यातून मार्ग काढणे कर्तव्याचे झाले,
हे ही वाचा - पंजाबराव डख यांचा पावसाबाबत अंदाज, सप्टेंबरमध्ये ‘या’ ठिकाणी होणार अतिवृष्टी
देशाचं भविष्य जर नशेच्या आहारी जात असेल तर देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहणे व्यर्थ समजतो.मुस्लीम धर्मात नशा करणे व्याज घेणे हराम (प्रतिबंधित) केलेले असतांना शिक्षणाचा अभाव व मुस्लीम धर्माच्या शिकवणीचा खरा अर्थ कळला नसल्याने काही तरुण आज भरकटले असून विलासी
आयुष जगण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी केलेले तरुण वाम मार्गाने जात असल्याचे वाईट चित्र सगळीकडे पसरत आहे, आज मुस्लीम धर्मात अश्या व्यसनी व धर्माच्या चांगल्या शिकवणी पासून दुरावलेल्या तरुणांचे प्रमाण कमी जरी असले तरी ही बाब खूप चिंतेची आहे, मुस्लीम धर्मात सण उत्सव चे प्रमाण कमीच असतात संदल (उर्स) सारखे अपवाद वगळता प्रत्येक सणाचा महत्व व त्याचे कठोर नियम असल्याने नशापाणी चा स्थर कमीच दिसतो परंतु संदल (उर्स) सारख्या उत्सवात ढोल ताशांच्या गजरात बेधुंद होऊन नाचण्यासाठी वर्जित केलेल्या अमली पदार्थांचे सेवन व चिल्लमच्या धुरांचे लोट सर्रास
उडतांना दिसतात. दारिद्र्य परिस्थिती, शिक्षणाचा अभाव कोणताच उद्देश साध्य न झाल्याने जीवनात नैराश्य आलेले आपला आळशी पना झाकण्यासाठी फकिरी परिधान करून गांज्यच्या नशेत आयुष जगणारे दर्गा परिसरात नेहमीच आढळतात अजमेर सारख्या दर्गावर कुठंही कोपच्यात (अडगळ) मध्ये आपल्या सारख्याच नैराश्य ग्रस्त चेल्या चपाट्यांना घेऊन चिलमीचे कश मारतांना सहजच दिसतील. नशापानीचा व्यसन जडलेल्या अशा लोकांचा मस्जिद कडे किंवा धर्माच्या शिकवणीकडे फारसा कल नसल्याने, धार्मिक विद्वान, स्कॉलर, प्रबोधनकार, यांच्या शिकवणीचा भरकटलेल्या तरुणांच्या मनावर
फारसा परिणाम होत नाही, वरळी, मटका, व्याजाचा धंदा, दारू, गांजा, व ईतर नशिले पदार्थ घेण्यात व त्याची लत लागण्याचे प्रमाण आज घडीला प्रमाण कमी जरी असले तरी भविष्यात ही बाब चिंताजनक ठरू शकते, भरकटलेली अशी तरुणाई फक्त मुस्लीम समाजातच नाही तर प्रत्येक धर्मात आढळून येते त्याला कारणीभूत काही प्रमाणात राजकीय मंडळी पण आहे घोट भर दारू मूठ भर चिवडा वाटीभर रसा हे राजकारणातील निवडणुकीचे ब्रीद वाक्यच बनले आहे त्यासोबत आज काल धार्मिक उत्सव, महापुरुषांच्या जयंत्या मध्ये दारू हा अविभाज्य घटक बनल्याचे चित्र दिसत आहे, महापुरुषांची जयंती असो
किंवा, दहीहंडी, गणेश उत्सव सारखे पवित्र सण असो डिजे च्या कर्णकर्कश आवाजावर थिरकण्यासाठी दारू पिऊन उत्तेजीत होण्याची अनिष्ट प्रथा निर्माण होतांना दिसत आहे, ज्या पोलिस प्रशासनाला सहकुटुंब कोणतेच सन साजरे करता येत नाही अश्या पोलिस प्रशासनाला या तळीरामांना आवरता आवरता नाकी नऊ येतात. अश्या सामाजिक व महापुरुषांच्या कार्यक्रमाचे जबाबदार व आयोजक पण या आंबट शौकिनांच्या वागण्याने त्रस्त झालेले असतात कारण कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दक्षता घेतं असातांना प्रशासनाची टांगती तलवार कायम डोक्यावर असते. हिंदू मुस्लिम शीख ईसाई बौद्ध अश्या वेगवेगळ्या धर्माच्या
संस्कृतीचे रक्षण व प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार वागण्याचे स्वातंत्र्य फक्त भारतातच आहे अशा विविधतेने नटलेल्या भारतात आता विदेशी कल्चर ने आपली पाळेमुळे घट्ट रोवली असून बर्थ डे, न्यू इयर, व्हॅलेंटाईन डे, लवर्स डे, साजरा करतांना दारूचा आनंद घेणारी भारतीय युवा पिढी आता विदेशी कल्चर अंगीकारल्याने महापुरुषांचा जयंत्या, धार्मिक उत्सवात दारू अत्यावश्यक झाल्यासारखी दिसत असल्याने तरुणाई व्यसनाच्या विळख्यात गुरफटली आज अशा प्रकारचे प्रमाण कमी असले तरी भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहेच, भावी पिढीला इंटरनेट च्या जाळ्यात व दारूच्या बाटलीत बुडतांना पाहून देशाला आर्थिक, विकासात्मक महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहणे आज तरी शक्य नाही.
मुख्तार शेख
७०५७९११३११
Share your comments