1. बातम्या

युवा शेतकरी अभिषेक खेरडे हे ठरले राज्यस्तरीय कृषिरत्न पुस्काराचे मानकरी

अचलपुर तालुक्यातील धोतरखेडा या छोट्या गावातील शिक्षणाने इंजिनीरिंग पदवीधर

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
युवा शेतकरी अभिषेक खेरडे हे ठरले राज्यस्तरीय कृषिरत्न पुस्काराचे मानकरी

युवा शेतकरी अभिषेक खेरडे हे ठरले राज्यस्तरीय कृषिरत्न पुस्काराचे मानकरी

अचलपुर तालुक्यातील धोतरखेडा या छोट्या गावातील शिक्षणाने इंजिनीरिंग पदवीधर , संत्रा शेती मार्गदर्शक, युवा शेतकरी आणि व्यावसायिक अभिषेक सुनीलपंत खेरडे यांना राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम हा २१ मे रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हॉल,मुंबई या ठिकाणी पार पडला. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष (काँग्रेस) माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते , कृषी क्षेत्रातील विशेष कार्य, संत्रा तज्ञ म्हणून नावलौकिक असलेले अभिषेक यास कृषिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

त्यावेळी महाराष्ट्रतील एकूण 26 जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावती चे अध्यक्ष मा. प्रकाश दादा साबळे यांनी चे पुरस्कार जाहीर केले होते.

अभिषेक हा गेल्या दोन-तीन वर्षापासून सतत शेतकऱ्यांच्या सेवेत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती व नवनवीन तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन आतापर्यंत करत आला आहे. अभिषेक सु खेरडे यास राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार प्रधान करण्यात आल्याने ही बाब तालुक्यासाठी व गावासाठी अभिमानास्पद असल्याने अभिषेक खेरडे यांच्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. अभिषेक हा गेल्या दोन-तीन वर्षापासून सतत शेतकऱ्यांच्या सेवेत आहे. 

शेतकऱ्यांना फोनवर, सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रत्यक्ष भेटीतून शेतकरयांना मार्गदर्शन करत आहे. 

कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, शेतीचा खर्च कमी करणारे घटक, जैविक शेती, याबाबत प्रामुख्याने महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले आहे. सतत दोन वर्षापासून शेतीक्षेत्रामध्ये आणि समाजासाठी उत्कृष्ट कार्य केले आहे. गावातील शेतकऱ्यांना पिक तंत्रज्ञान, पीक बदल,प्रक्रिया उद्योग या बाबत मार्गदर्शन केले आहे.

त्याच बरोबर याअगोदर अभिषेक ला सुपर शेतकरी पुरस्कार मिळाला आहे आणि महाराष्ट्र रत्न 2022 साठी नामांकन जाहीर झाले आहे .अभिषेक सु खेरडे यास राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार प्रधान करण्यात आल्याने ही बाब तालुक्यासाठी व गावासाठी अभिमानास्पद असल्याने अभिषेक खेरडे यांच्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. अभिषेक हा गेल्या दोन-तीन वर्षापासून सतत शेतकऱ्यांच्या सेवेत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती व नवनवीन तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन आतापर्यंत करत आला आहे. आता अभिषेक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

English Summary: Young farmer Abhishek kherede state lavel krushiratna award Published on: 23 May 2022, 02:31 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters