आधार कार्डशिवाय मिळेल एलपीजी सिलिंडरवरील अनुदान; पण करा 'हे' काम

22 January 2021 05:59 PM By: भरत भास्कर जाधव
एलपीजी सिलिंडरवरील अनुदान

एलपीजी सिलिंडरवरील अनुदान

दर महिना अथवा दीड महिन्याने गॅस सिलिंडर हा बुक केला जातो. घरगुती एलपीजी गॅसचे बुकिंग केल्यानंतर पाठवण्यात येणारी सबसिडी सरकारकडून ग्राहकांच्या खात्यामध्ये थेट पाठवली जाते. सबसिडीचा लाभ घेण्यासाठी तुमच्या गॅस कनेक्शनसोबत तुमचे आधार कार्ड लिंक असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा कोणत्याही कारणास्तवर आधारकार्ड आणि गॅस कनेक्शन लिंक नसेल तरीदेखील आता सबसिडी मिळवू शकता, याविषयीचे वृत्त एका हिंदी वृत्त वाहिनीने दिले आहे.

अनुदान मिळावे, यासाठी काय करावे लागेल ते जाणून घेऊया. गॅस सबसिडी  मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन एलपीजी डिस्ट्रिब्यूटरला बँक खाते क्रमांक द्यावा लागेल. ज्यानंतर ग्राहकांच्या खात्यामध्ये सबसिडीची रक्कम थेट जमा होईल. बँक खात्यात माहितीमध्ये तुम्हाला खातेधारकाचे नाव, बँक, खाते क्रमांक, बँकेच्या शाखेचा आयएफएससी कोड आणि १७ अंकी एलपीजी कंझ्युमर आयडी द्यावा लागेल. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्याच ग्राहकांना ही सुविधा देण्यात आली आहे.

ऑनलाइन पद्धतीने गॅस कनेक्शनशी असं लिंक करा तुमचं आधार कार्ड

सर्वात आधी तुमचा मोबाईल नंबर इंडेन गॅस कनेक्शनमध्ये रजिस्टर करावा लागेल. 

यानंतर आधारच्या आधिकृत वेबसाईटवर जा.

याठिकाणी तुम्हाला आवश्यक डिटेल्स भरावे लागतील. यामध्ये बेनिफिट टाईपमध्ये एलपीजी, स्कीमचं नाव, आणि वितरकाचं नाव तसेच ग्राहक क्रमांक टाका.

 

आधार नंबर टाकण्याआधी तुमचा मोबाईल नंबर आणि इमेल आयडी टाका. 

सबमिट बटणवर क्लिक करा. यानंतर मोबाईल,ईमेलवर एक ओटीपी येईल.

वन टाईम पासवर्ड टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.

घरगुती गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना आता आणखी एक सोपा पर्याय उपलब्ध होणार आहे. आता फक्त एक मिस्ड कॉल देऊन एलपीजी सिलिंडर बुक करता येणार आहे.

देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईलकडून यावर्षी आपल्या एलपीजी गॅसधारकांसाठी ही नवी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना एक मिस्ड कॉल देऊन सिलिंडर बुक करता येणार आहे. इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, संपुर्ण देशभरात ही सुविधा सुरू  करण्यात आली आहे. ग्राहकांना गॅस बुक करण्यासाठी 8454955555 या क्रमांकावर रजिस्टर्ड नंबरवरुन मिस्ड कॉल द्यावा लागेल.

 

यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. सध्याच्या आईवीआरएस कॉल प्रणालीत कॉलसाठी सामान्य दर आकारले जातात. मात्र, आता नव्या सुविधेमुळे ज्येष्ठ व्यक्ती आणि आईवीआरएस प्रणालीचा वापर करण्यात अडचणी जाणवणाऱ्या  लोकांची सोय होणार आहे.

aadhar card LPG cylinders आधार कार्ड एलपीजी सिलिंडर
English Summary: You will get a subsidy on LPG cylinders without Aadhar card, but do it

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.