राज्यातील प्रामुख्याने नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर 'येलो मोझ्याक' हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने बाधित पिकांचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत.
पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानात झालेले बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
विशेषत: चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम, नांदेड आदी जिल्ह्यांत हा प्रादुर्भाव अधिक दिसत असल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची वेळेत मदत मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.
नागपूर जिल्ह्यात नागपूर तालुक्यातील अड्याळी, उमरगाव, उमरेड तालुक्यातील पाचगाव, चांपा, गावसुत, कुही तालुक्यातील चाफेगडी, मोहगाव, चीचघाट, मौदा तालुक्यातील वडना, मोहखेडी, पावडदवना आदी ठिकाणी भेटी देऊन अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ठिकठिकाणी शेतकरी बांधवांशी संवाद साधला तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी विविध मागण्यांची निवेदने स्वीकारली.
सोयाबीन पिकावर पडलेल्या 'Yellow Mozac' अळीमुळे झालेले नुकसान तसेच अन्य नुकसानीबाबतचे पंचनामे तसेच एसडीआरएफ व एनडीआरएफ च्या निकषानुसार अतिवृष्टी बाधित क्षेत्रास सहाय्यक अनुदान व पीकविमा मिळणेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले.
शेती महामंडळाचे प्रश्न तातडीने सोडवणार, विखे पाटलांचा मोठा निर्णय
Share your comments