कायम चर्चेत राहणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांना मंगळवारी पदमुक्तीचे आदेश राज्य सरकारतर्फे देण्यात आले होते. यामुळे पुन्हा एकदा याची चर्चा सुरू आहे. अनेकदा आपल्या कामामुळे ते चर्चेत असतात.
त्यांची बदली शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आल्याचे समजते. संपूर्ण राज्यात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटावून अधिकाऱ्यांना एक शिस्त लावली होती.
कामचुकारांची झोप उडवणारे व नियमाला धरुन काम करणारे प्रमाणिक अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे. आता शिर्डी साईबाबा संस्थानच्या मंदिर प्रशासनातील कर्मचाऱ्यासह मंदिराच्या नावाखाली चुकीची दुकानदारी करणाऱ्यांची झोप उडाली आहे.
कर्जमाफी मिळूनही शेतकऱ्यांना दिली नोटीस, एसबीआय बँकेला बजावला दंड
दरम्यान, तुकाराम मुंढे हे कुठेच जास्त काळ टिकले नाहीत. त्यांच्या कायमच बदल्या होत राहिल्या आहेत. पण, त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे ते सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय आहेत. तुकाराम मुंढे यांची ही 20 वी बदली झाली आहे.
काट्यांबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, शेतकऱ्यांची काटामारी थांबणार का?
कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदी ते काम करत होते. अवघ्या दोन महिन्यातच तुकाराम मुंढे यांची कुटुंब कल्याण विभागातून बदली झाल्याने पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची नाराजी हे त्यांच्या बदलीमागील कारण असल्याचे सांगितले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या;
हे शेततळे बांधण्यासाठी 2 वर्ष लागली असून 22 लाख रुपये खर्च झाला आहे
'महाराष्ट्राचे हक्काचे पाणी अवैधपणे गुजरातला, आमदारांना या कराराची माहिती नाही'
वीजबिल माफ करा असे बोललोच नाही- देवेंद्र फडणवीस
Share your comments