व्वा ! ५०० एकरावर फुलवली कोथिंबिरीची शेती, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

08 January 2021 03:33 PM By: KJ Maharashtra
पाचशे एकरवर कोथिंबीरीची लागवड

पाचशे एकरवर कोथिंबीरीची लागवड

सध्या नांदेड जिल्ह्यातील शहापूर वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आले आहे.  गावकरी ते राव काय करी ही म्हण तुम्ही ऐकली असेल. हीच म्हण शहापूर गावाने खरी करुन दाखवली आहे. ते म्हणजे या भागात चक्क अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तब्बल ५०० एकरावर धन्याचा उत्पादन घेण्यासाठी कोथिंबीरीचे लागवड केली आहे. कोथिंबीर पिके कमी खर्चात आणि कमी वेळात येणारे पीक असल्यामुळे हे पीक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा नफा मिळवून देत आहे.

जर एक एकर कोथिंबिरीचा विचार केला तर त्यापासून १० क्विंटल धन्याचे उत्पादन होते. प्रतिक्विंटल धन्याला ७ हजार ते १० हजारच्या दरम्यानचा भाव मिळतो. येथील शेतकऱ्यांनी मुख्य पीक म्हणून कोथिंबीर लागवड केली आहे.जमिनीत एकच प्रकारचे पीक वारंवार घेतल्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो तसेच पिकांवर घाटे आळी, मररोग तसेच इतर प्रकारच्या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना सोडून कोथिंबीरीची लागवड करण्याकडे भर दिला आहे. कोथिंबीर पिकाचा विचार केला तर इतर पिकांच्या तुलनेत त्याला कमी पाणी लागते तसेच पिकाची काढणी हार्वेस्टरने केली जाते. त्यामुळे काढणीचा खर्च ही वाचतो. त्यामुळे या भागात कोथिंबिरीचा सुगंध दरवळतोय.

 

कोथिंबीर पिकाचा विचार केला तर शेतकरी इतर पिकांमध्ये आंतरपीक म्हणून काही ओळी कोथिंबीरीची लागवड करतात. मात्र या परिसरातील शेतकऱ्यांनी कोथिंबिरीला मुख्य पिकाचा दर्जा देऊन कोथिंबीरीची लागवड केली. त्यामुळे एकरावर क्षेत्रात कमीत कमी ५० हजार रुपयापर्यंत नफा तेथील शेतकऱ्यांना मिळू शकतो. तसेच एकरी १० क्विंटल धन्याचे उत्पादन होत असल्याने आणि धन्याचा भावाचा विचार केला तर प्रति क्विंटल ७ ते १० हजार रुपये असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात चांगल्या पद्धतीने वाढ होईल असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :पॉलिहाऊसमध्ये करा जरबेरा फुलांची लागवड; होईल लाखो रुपयांची कमाई

 धन्याचे उत्पादन मिळत असताना येणाऱ्या काळामध्ये धने पावडर बनवण्याची मशीन खरेदी करून कंपनी स्थापन करण्याची येथील शेतकऱ्यांची इच्छा आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचा हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील हजारो शेतकरी येथे येत असतात. तसेच या शेतकऱ्यांना जिरे पावडरचा कारखाना सुरू करायचा असून अनेक जण त्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.

 


हा गटशेतीचा अनोखा प्रयोग पाहून इतर शेतकऱ्यांनी त्याचे अनुकरण करावे आणि एकीच्या बळामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या गटशेतीचा मार्ग अवलंबला तर शेती परवडण्याजोगी होईल यात शंका नाही.

Cultivation Cilantro farming farmers नांदेड nanded कोथिंबिरीची शेती शहापूर
English Summary: Wow! Cultivation of flowering cilantro on 500 acres will be of great benefit to the farmers

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.