जागतिक दूग्ध दिवस : आरोग्याला लाभकारी असलेल्या दुधाचा आज हा मानाचा दिवस

01 June 2020 04:17 PM By: भरत भास्कर जाधव

दूध हा एक जीवनावश्यक घटक मानला जातो.  लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच दूधाची आवश्यकता असते.  पाण्यानंतर कदाचित अधिकृतरित्या प्यायला जाणारा दूध हाच एकमेव पदार्थ असावा. दुधातून आपल्याला कॅल्शियम मॅगनिशियम,झिंक, फॉस्फरस,ऑयोडीन, आयर्न, पोटॅशियम, फोलेट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी12, प्रोटीन, हे घटक मिळत असतात.  दूध हा अधिक ऊर्जा देणारा पदार्थ आहे. दूध प्यायल्याने मानवी शरीरात कमी वेळात जास्त उर्जा उत्पन्न होऊ शकते. कारण, दुधात अधिक मात्रेत प्रोटीन असते.

आरोग्यासाठी लाभकारक असलेल्या दुधाचा आज महत्त्वाचा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रकडून (United Nation) आज १ जून हा  दिवस जागतिक दूग्ध दिवस म्हणून साजरा केला जातो.  अनेक देशांमध्ये याच तारखेला दुग्ध दिवस साजरा केला जात असे.  सर्वासामान्य नागरिकांना दूधाबद्दल माहिती कळावी आणि जगभराती देशांना दुधाचे महत्त्व ध्यान्यात यावे यासाठी हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला.  प्रत्येक वर्षी दुग्ध दिवसाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र द्वारे एक थीम निश्चित केली जाते.  या थीमचं एकच उद्देश असतो तो म्हणजे सर्व नागरिकांपर्यंत दूध सहजपणे पोहाचवं आणि सर्वासामान्य नागरिकांना दुधाबद्दल माहिती कळावी आणि जगभराती देशांना दुधाचे महत्त्व ध्यान्यात यावे. 

आधी हा दिवस इतर कार्यक्रमाच्या आधारे साजरा केला जात, म्हणजे मॅरेथॉन, शाळेतील कार्यक्रम यातून हा दिवस साजरा केला जात.  वर्ष २००१ मध्ये हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. याची सुरुवात संयुक्त राष्ट्राच्या खाद्य विभाग आणि कृषी संघटनानांकडून करण्यात आली होती.  मागील वर्षी दुग्ध दिवसात ७२ देशांनी सहभाग घेतला होता. या देशांमध्ये साधारण ५८६ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  भारतात १ जून दुग्ध दिवस आणि २६ नोव्हेंबरला राष्ट्रीय दुग्ध दिवस साजरा केला जातो.  कारण याच दिवशी १९२१ मध्ये धवलक्रांती आली होती.  जगभरातील अनेक देश दूध उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतातही धवलक्रांती म्हणजेच दूध वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य सरकारच्या माध्यमातून केले जाते.

world milk day milk production farmer united state जागतिक दुग्ध दिवस दुध उत्पादन संयुक्त राष्ट्र संयुक्त राष्ट्र खाद्य विभाग आणि कृषी संघटना United Nations Food Department and Agriculture Organization
English Summary: World Milk Day: today's date is important day to milk

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.