1. बातम्या

“…अन्यथा पुन्हा जगभरात लॉकडाउन करावा लागेल'' - आरोग्य संघटना

KJ Staff
KJ Staff


जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या विषाणूचा प्रादुर्भाव अजून पसरत आहे. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केला. भारतातही सध्या लॉकडाऊन चालू आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन अनेक देश शिथील करत असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाचा इशारा दिला आहे.

 जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी इशारा देताना सांगितले आहे की, “सर्व देशांनी काळजी घेण्याची गरज आहे. लॉकडाउन लगेचच शिथील न करता टप्प्याटप्प्याने उठवण्याची गरज आहे”. निर्बंध शिथील करताना काय काळजी घेतली पाहिजे यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे टेड्रोस यांनी मांडले आहेत. निर्बंध शिथील झाल्यानंतरही लोकांवर लक्ष ठेवण्याची गरज असून आरोग्य यंत्रणाही तयार असली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.“जर पूर्वकळजी घेतली नाही तर परिस्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता असून पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाउन करावा लागेल,” असेही टेड्रोस यांनी सांगितलं आहे.  “जरी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी पूर्वीप्रमाणे सगळं काही सुरळीत होण्याची शक्यता कमी असल्याचेही त्यांनी सांगितले”.

करोनाचा प्रादुर्भाव नक्की कमी होईल, पण त्यानंतर जनजीवन पूर्वीप्रमाणे राहणार नाही. आपण घाबरुन जगू शकत नाही, पण त्याचवेळी तयार राहणे गरजेचे आहे. आपण एकीकडे या महामारीशी लढा देत असताना दुसरीकडे अशा साथींचा सामना कऱण्याची तयारीही केली पाहिजे. जगभरातील आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यासाठी ही योग्य संधी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. आपण कोरोनापासून जर काही शिकलो आहोत तर ते म्हणजे आरोग्य सेवेत गुंतवणूक करणे अनेकांचा प्राण वाचवू शकते,” असे टेड्रोस यांनी सांगितले आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters