शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींची 5 जानेवारी रोजी कार्यशाळा

03 January 2019 08:28 AM


मुंबई:
औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे पाच जानेवारी रोजी शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून कार्यशाळेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे.

राज्यात सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या 1 हजार 700 शेतकरी उत्पादक कंपन्यांना यापुढे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने प्राधान्याने भूखंड वाटप करण्याचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतलेला आहे. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांची औद्योगिक चळवळ पुढे नेण्यासाठी सर्व कंपनीच्या प्रतिनिधींची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.  

सुखी महाराष्ट्र, समृद्ध शेतकरी ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी उद्योग विभागाने राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी कंपन्यांसाठी एमआयडीसीमध्ये प्राधान्याने भूखंड दिला जाणार आहे. यापूर्वी शेतकरी कंपनी स्थापन करण्यासाठी शंभर कोटीपर्यंतची भांडवल मर्यादा आता दहा कोटीपर्यंत खाली आणली आहे. यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र येऊन विविध उद्योग सुरू करतील. शेतकरी कंपन्या सुरू झाल्यास शेतमालावर प्रक्रिया होऊन मूल्यवृद्धी होणार आहे.

Subhash Desai farmer producers company FPO शेतकरी उत्पादक कंपनी सुभाष देसाई महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करमाड एमआयडीसी
English Summary: Workshop for Farmer Producer Companies Members on 5 January

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.