भारत हा कृषीप्रधान देश आहे देशातील शेतकरी बांधव शेती करून आपले व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत असतात. शेतीतून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावरच शेतकरी व त्याच्या कुटुंबाचे भरण पोषण अवलंबून असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी शासनाकडूनही प्रयत्न केले जातात.
याशिवाय शेतकरी बांधव देखील अहोरात्र काबाडकष्ट करून चांगले उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न करत राहतो. राज्यात वेगवेगळ्या फळपिकांची लागवड केली जाते. यामध्ये अंजीरचा देखील समावेश आहे. राज्यात अंजिरची लागवड सर्वात अधिक पुणे जिल्ह्यात बघायला मिळते.
मोठी बातमी:-Success: आदिवासी शेतकऱ्याने कारल्याची लागवड करून मिळवले लाखोंचे उत्पादन
राज्यात एकूण चारशे हेक्टर क्षेत्रावर अंजीर लागवड केली गेली आहे या एवढ्या मोठ्या क्षेत्रातून सुमारे 4300 मेट्रिक टन एवढे एवढ्या ताजे अंजीर चे उत्पादन घेतले जाते. यापैकी सुमारे 90 टक्के उत्पादन केवळ आणि केवळ पुणे जिल्ह्यातून प्राप्त होत असते. यावरून पुणे जिल्ह्याचे अंजीर उत्पादनातील स्थान आपल्या लक्षात आलेच असेल. जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात अंजिराची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. याच पुणे जिल्ह्यातून अंजीर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
कृषी पणन महामंडळाच्या सहकार्याने पुरंदर तालुक्यातून ताजे अंजीर हॅम्बर्ग आणि जर्मनी या युरोपियन बाजारपेठेत निर्यात करण्यात आले. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की पुरंदर तालुक्यात पूना अंजीर ही अंजीरची सर्वोत्कृष्ट जात उत्पादित केली जात असते. विशेष म्हणजे पुरंदर तालुक्यात उत्पादित केल्या जाणाऱ्या या जातीला जीआय टॅग अर्थात भौगोलिक मानांकन देखील देण्यात आले आहे. यामुळे विदेशात पुरंदरच्या अंजीरास बाजारपेठ मिळणे तुलनेने सोपे झाले आहे. यापूर्वी क्वचितच वेळी राज्यातून विदेशात ताजा अंजीर निर्यात केला गेला आहे. यावर्षी मात्र, अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या योग्य मोबदला मिळावा म्हणून युरोपीयन बाजारपेठेत पुरंदरचे अंजीर निर्यात केले गेले आहेत.
महत्वाची बातमी:-मालेगाव तालुक्यातील लेंडाणे येथील कलिंगडांची थेट काश्मीरच्या बाजारात झेप
यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सहकार मंत्र्यांच्या प्रेरणेने तसेच कृषी पणन महामंडळाच्या सहकार्याने इतिहासात प्रथमच पुरंदर येथील ताजे अंजीर युरोपीय बाजारपेठेत पाठवले. पुरंदर हायलँडस् फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या माध्यमातून युरोपियन बाजारपेठेत हे ताजे अंजीर हॅम्बर्ग, जर्मनी येथे निर्यात करण्यात आले आहेत. यामुळे अंजीर उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीला चांगले फळ मिळाले असल्याचे सांगितले जात आहे.
Share your comments