1. बातम्या

शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य करणार्‍या नवदुर्गांचा कृषी विज्ञान केंद्रातर्फे सन्मान

KJ Staff
KJ Staff


नारायणगाव:
ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव आणि आयटीसी मिशन सुनहरा कल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक शेतकरी महिला दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, गुलाबशेठ पारखे, वि. सह. सा. कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे, पंचायत समितीचे सदस्य दिलीप गांजळे, सामाजिक कार्याकर्त्या मोनिकाताई मेहेर, अंजलीताई पारगावकर, अंबिका मसाला उद्योजिका कमलाताई परदेशी, शिवनेर प्राईमच्या संपादिका मनीषा औटी, कांचन फुलसुंदर, स्मिता शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रशांत शेटे, आयटीसीचे प्रसाद देशकर, भारत राऊत बोरी गावच्या सरपंच पुष्पा कोरडे, प्रगतशील महिला शेतकरी पूनम नवले आदि मान्यवर जुन्नर आंबेगाव येथील महिला शेतकरी मोठ्या उपस्थित होत्या.

यावेळी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या पदार्थाचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. 
प्रामुख्याने होम मेड चॉकलेट, केळीचे वेफर्स, कुरडई, पापड, बेकरी पदार्थ, आवळ्यापासून बनविलेली सुपारी, कॅन्डी, विविध सेंद्रिय उत्पादने, सेंद्रिय गुळ, सेंद्रिय खते से अनेक स्टॉल महिलांनी लावले आहेत. केंद्रामार्फत शेतकरी महिलांचे शारिरीक कष्ट कमी करण्याकरिता वापरत येणारे अवजारे प्रदर्शनात मांडण्यात आले होते. 

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना गटनेत्या आशाताई बुचके म्हणाल्या की, पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन आज महिला शेतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. अनेक महिला बचत गटांच्या माध्यामतून लघु उद्योगांची उभारणी करत आहे त्यांचे हे प्रयत्न खरेच खूप कौतुकास्पद आहे. घरकाम, मुलांचे शिक्षण आणि सामाजिक भान ठेऊन महिला अहोरात्र कष्ट करताना दिसतात. सावित्रीबाई फुले यांच्या योगदानामुळे महिलाना शिक्षणाचे दरवाजे खुले झाल्यामुळे आज महिला सर्व क्षेत्रात भरीव कार्य करताना दिसून येत आहे.  

प्रमुख व्याख्यात्या कमलाताई परदेशी यांनी त्यांचे अनुभव कथित करताना म्हणाल्या कि आजही ग्रामीण भागातील 50 टक्के महिला या चूल आणि मुल यातच गुरफटलेल्या दिसतात परंतु महिलांनी समाजासमोर येऊन आपले कौशल्य दाखविण्याची गरज आहे. ग्रामीण महिलेत अनेक कला कौशल्य लपलेले असते ते बाहेर येणे गरजेचे आहे. आजच्या कार्यक्रमच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या प्रदर्शनात महिलांनी खूप सारे नाविन्यपूर्ण उत्पादने तयार केलेली आहे त्यांना मार्केटिंगसाठी प्रोत्साहित केले तर निचितच या महिला त्यांचा कुटीर उद्योग लघु उद्योगात रुपांतर झालेले दिसेल. शिवनेर प्राईमच्या संपादिका मनीषा औटी यांनीही शेतकरी महिलांना मार्गदर्शन केले. 

दरम्यान जुन्नर, आंबेगाव तालुक्यात शेतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या  नवदुर्गा  महिला जिजामाता कृषिभूषण वानिताताई गुंजाळ कांदळी, जिजामाता कृषिभूषण पुष्पा कोरडे बोरी, पूनम नवले नवलेवाडी, पल्लवी हांडे गोळेगाव, रत्नप्रभा काकडे पिंपरी पेढार, उज्वला घाडगे पिंपरी पेढार, वैशाली जाधव घोडेगाव, हिराताई काळे शिरोली बु, हेमलता शिंदे राजुरी या नवदुर्गा 9 शेतकरी महिलांचा प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गृहशास्त्र विभाग प्रमुख सौ. निवेदिता शेटे व आभार कृषी विस्तार तज्ञ राहुल घाडगे यांनी केले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters