ड्रोनचा साहाय्याने एका दिवसात करू शकता 10 एकर क्षेत्र फवारणी, पहा ड्रोन वापराचे फायदे.. ड्रोनचा साहाय्याने एका दिवसात करू शकता 10 एकर क्षेत्र फवारणी, पहा ड्रोन वापराचे फायदे.
ड्रोन तंत्रज्ञान :
शेतकऱ्याला शेतीमध्ये हातभार लागावा म्हणून आज सरकार नवीन नवीन कृषी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे व त्याचा एकमेव उद्देश असा की कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे. कृषी ड्रोन हे त्यापैकीच निर्माण केलं गेलेलं एक आधुनिक तंत्रज्ञान आहे.
ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर :
शेतकरी आपल्या आरोग्याचा विचार न करता रासायनिक फवारण्या करत असतो.पारंपरिक शेतीचे पद्धतीनं फवारण्यासाठी शेतकऱ्याला स्वतः शेतामध्ये जाऊन पंपाद्वारे खतांची फवारणी करावी लागते.
युरिया सारख्या खतांची हाताने फवारणी करत असतो व यामुळे शेतकऱ्याच्या आरोग्याला विविध प्रकारची हामी होत असते. या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर विविध कीटकनाशक व खतांची फवारणी करण्यात केला जातो. हा ड्रोन 30 मीटरच्या उंचीपर्यंत जाऊ शकतो व याची क्षमता दहा लिटर कीटकनाशक साठवण्याची आहे.
ड्रोन तंत्रज्ञानाचे फायदे :
• शेतकरी आपल्या कामात कितीही सक्षम असला तरी त्याला शेतीच्या कामासाठी मजुरांची गरज भासते.
सध्याच्या काळात मजूर मिळण्याची परिस्थिती सुद्धा बिकट होत चालली आहे तर या ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्याचा वेळही वाचेल व मजुरीसाठी खर्च होणाऱ्या पैशाची सुद्धा बचत होईल.
• ड्रोन च्या सहाय्याने एका दिवसात १० एकर क्षेत्रात फवारणी केली जाऊ शकते.
• या तंत्रज्ञानामुळे रासायनिक पदार्थांमुळे शेतकऱ्याच्या आरोग्यास हमी पोहोचत नाही.
२०२२-२३ च्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पात याची नोंद :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पात कृषी तंत्रज्ञान विभागाला जोर दिला आहे. कृषी ड्रोन तंत्रज्ञान आता शेतामध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जाणार याची घोषणा त्यांनी केली. तर या ड्रोन चा वापर पिकांवरती लक्ष ठेवणे, जमीन नोंदणी करणे व कीटकनाशकांच्या फवारणीसाठी केला जाणार आहे.
Share your comments