सध्या गेल्या अनेक दिवसांपासून यशवंत सहकारी साखर कारखाना बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. असे असताना आता तो सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
यासाठी चर्चा करणे आणि कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक घेण्यासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यासाठी सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढील शनिवारी ही सभा होणार आहे. कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकर्यांनी सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन गोंदे यांनी सूचनेद्वारे केले आहे. यशवंत कारखान्यातील आर्थिक अडचणी आणि गैरव्यवस्थापनामुळे कारखाना 2011-12 या वर्षापासून बंद आहे.
उत्पादक उपाशी, व्यापारी तुपाशी, कांद्याचा झालाय वांदा...
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या मान्यतेने ही सभा होत आहे. अनेक वर्षे हा कारखाना सुरू करण्याबाबतचा रेंगाळलेला प्रश्न या विशेष सभेच्या निमित्ताने तरी मार्गी लागणार का? याकडे हवेली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यात गारपीटीची शक्यता, शेतकरी चिंतेत, काळजी घेण्याचे आवाहन
प्रादेशिक साखर उपसंचालक संजय गोंदे यांच्या अध्यक्षतेखाली थेऊर येथे कारखानास्थळावर 11 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकर्यांनी सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन गोंदे यांनी सूचनेद्वारे केले आहे.
महत्वाच्या बातम्या;
स्वेच्छा मरणासाठी राष्ट्रपतींना पत्र! नाशिकच्या शेतकऱ्यांचे कांद्यासाठी उपोषण..
स्वेच्छा मरणासाठी राष्ट्रपतींना पत्र! नाशिकच्या शेतकऱ्यांचे कांद्यासाठी उपोषण..
100 म्हशी आणि 100 एकर जमीन! रामेश्वर मांडगेंनी करून दाखवलं
Share your comments