1. पशुधन

100 म्हशी आणि 100 एकर जमीन! रामेश्वर मांडगेंनी करून दाखवलं

अनेक शेतकरी दुधाचा व्यवसाय (Dairy Farming) करतात. यामधून ते चार पैसे कमवतात. या व्यवसायातून ते स्वत:ची आर्थिक प्रगतीही साधत आहेत. अशाच एका हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील शेतकऱ्यानं दूध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी आणली आहे. यामुळे त्यांची चर्चा सुरु आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
100 buffaloes and 100 acres of land

100 buffaloes and 100 acres of land

अनेक शेतकरी दुधाचा व्यवसाय (Dairy Farming) करतात. यामधून ते चार पैसे कमवतात. या व्यवसायातून ते स्वत:ची आर्थिक प्रगतीही साधत आहेत. अशाच एका हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील शेतकऱ्यानं दूध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी आणली आहे. यामुळे त्यांची चर्चा सुरु आहे.

तीन एकर शेती आणि एका म्हशीपासून सुरु केलेला व्यवसाय आता विस्तारला आहे. आज त्या शेतकऱ्याकडे 100 एकर शेती आणि 100 म्हशी आहेत. रामेश्वर मांडगे असं हिंगोली जिल्ह्यातील बेलवाडी येथील शेतकऱ्याचे नाव आहे.

100 म्हशींच्या व्यवस्थापनासाठी दररोज याठिकाणी पाच ते सहा कामगार आहेत. या म्हशींच्या व्यवस्थापनासाठी हे कामगार दररोज सकाळी तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत राबतात. सकाळी दूध काढल्यानंतर या म्हशींना बंदिस्त गोठ्यामध्ये नेलं जातं.

दुपारच्या वेळी उन्हाच्या फटक्यापासून म्हशींचा बचाव व्हावा यासाठी शेतकरी मांडगे यांनी खास स्विमिंग पूल बांधला आहे. यामुळे हा गोठा बघण्यासाठी अनेक शेतकरी येत असतात. शेतकरी रामेश्वर मांडगे यांच्याकडे मुरा आणि जाफराबादी प्रजातीच्या 100 म्हशी आहेत. दरवर्षी शेतकरी रामेश्वर मांडगे स्वतः कडे असलेल्या 60 ते 70 एकर शेत जमिनीवर वर्षभर पुरेल एवढ्या चाऱ्याची लागवड करतात.

पीकविमा नेमका कोणाच्या फायद्याचा, त्याचा फायदा काय?

चाऱ्यासोबत हरभरा, ज्वारी, करडई, मका हे धान्य भरडून दररोज सरकी पेंडीचा खुराक एकत्र करुन म्हशींना दिला जातो. या म्हशींच्या शेतकरी मांडगे यांनी दोन प्रकारचे गोठे बांधले आहेत. एक बंदिस्त प्रकारचा गोठा आणि दुसरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अध्यायावत केलेला एक गोठा आहे.

या दोन्ही गोठ्यात या म्हशींचं व्यवस्थापन केलं जातं. काही वर्षांपूर्वी मांडगे यांच्या कपाळी गरिबीचा शिक्का लागलेला होता. हा शिक्का कसा पुसायचा याच विचारातून त्यांचे वडील आणि रामेश्वर मांडगे यांनी एक म्हैस आणि तीन एकर शेतीमधून या दुग्ध व्यवसायाची सुरुवात केली होती.

शेतकऱ्यांचा वाली आहे का कोणी? अधिवेशनात बघताय ना कसा राडा सुरूय..

आज त्यांच्याकडे 100 म्हशी आहेत. या म्हशीपासून दररोज 350 ते 400 लिटर दूध निघते. हे दूध कामगार आणि मांडगे स्वतः घरोघरी विकतात. त्याचबरोबर म्हशीच्या शेणाचा खत म्हणून वापर करतात. यामुळे त्यांचे पैसे वाचतात.

महत्वाच्या बातम्या;
उत्पादक उपाशी, व्यापारी तुपाशी, कांद्याचा झालाय वांदा...
धेनू ॲपच्या तंत्रामुळे फक्त एका तासातच विकली गाय, खरेदी विक्री झाली खूपच सोपी
शेतकऱ्यांनो कोरडवाहू शेतीतील खर्च करा कमी, तुमचं बजेट करा तयार..

English Summary: 100 buffaloes and 100 acres of land! Rameshwar Mandge did it Published on: 04 March 2023, 09:38 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters