सोमिनाथ घोळवे
कांदा काढणीस अजूनही महिनाभर वेळ आहे. मात्र पातीला पीळ पडू लागल्याने देशी दारू, Alika आणि स्टिकर (सुरुची) यांची एकत्रित मिश्रण करून फवारणी केली. याच्या एकत्रित फवारणीने पीळ पडणे थांबते आणि झळायला लागलेला कांदा उबदार होतो. तसेच कांद्याची पातीत तेज येते.
कांद्यावरील कीटकांचे प्रमाण कमी होते. विविध किडे कांद्यावर येऊन बसतात, ते बसत नाहीत. कांद्या वरील चिलटे कमी होऊन निरोगीपणा येतो. तसेच वाढ चांगली होते असे फायदे असल्याचा अनुभव या बाबतीत आहेत. त्यामुळे आज कांद्याला एका फवाऱ्याला अर्धी बॉटल देशी दारूची टाकली आहे. यात अल्कोहोलचे प्रमाण जास्त असरल्याने सॅनिटाईजर केल्या प्रमाणे कांद्याला होऊन जाते.
कांद्याला देशी दारूची फवारणी करण्याचा शोध हा शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार आहे. हा एक प्रयोग आहे. यावर अनेक बाजूने संशोधन होणे आवश्यक आहे. धुई पडल्यामुळे कांद्याची पात जाळून कांद्यावर रोग पडतो. यातून कांद्याला वाचविण्यासाठी कांद्यावर फवारणी करताना काही प्रमाणात देशी दारु वापरली जाते. देशी दारुच्या फवारणीमुळे व्हायरसची बाधा होत नाही असे मानले जाते.
रासायनिक खते व कीटकनाशकांचे दर गगनाला भिडले आहेत. भाववाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पाऊस गेला दीड महिन्यापासून नसणे आणि अधून-मधून धुके पडण्यामुळे कांद्याच्या पातीला पिळ पडू लागला आहे. तसेच रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, त्यामुळे सध्या अनेक शेतकरी देशी दारूची फवारणीची कामे करत आहेत. यात काही शेतकऱ्यांनी कमी खर्चात फवारणी करण्याकरिता देशी दारू प्रति पंप १०० मि. ली. टाकून फवारणी सुरू करणे चालू आहे.
(लेखक शेती , दुष्काळ , ऊसतोड मजुर प्रश्नांचे अभ्यासक असून 'द युनिक फाऊंडेशन, पुणे' येथे वरिष्ठ संशोधक आहेत.)
Share your comments