स्वाभिमानी पक्षाचे पक्षाचे महाराष्ट्रात देवेंद्र भुयार हे एकमेव आमदार आहेत. अमरावतीतील मोर्शी मतदारसंघातून ते आमदार आहेत. त्यांची स्वाभिमानी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आले. स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी 25 मार्च रोजी हिवरखेड येथील शेतकरी मेळाव्यात ही घोषणा केली आहे. स्वाभिमानी पक्षाशी निष्ठावान नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आल्यानंतर आमदार भुयार यांची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीकता वाढली होती. तसेच ते या कालावधीत ते स्वाभिमानी पक्षाच्या संपर्कात नव्हते असे आरोप आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला नाही असा आरोप असून त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे.
हिवरखेड येथील शेतकरी मेळाव्यात आमदार भुयार यांची स्वाभिमानी पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा राजू शेट्टींनी केली. शेतकरी मेळाव्यात बोलताना शेट्टी म्हणाले मी चुकीच्या माणसाच्या बाजूला उभ राहिलो ही माझी चूक होती. त्यासाठी मी जनतेची माफी मागतो. भुयार यांच्या विरोधात अनेक तक्रारी माझ्याकडे झाल्या होत्या.
भुयार याने जुने दिवस आठवावे त्यांनी मोठा झाल्याच्या नादात सामान्य जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळं जनतेच्या निर्णयाचा आदर करत त्याला पक्षातून हटवले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत भांडून भुयार साठी उमेदवारी घेतली होती. त्यावेळी भुयार यांचा नावाला विरोध होता, पण तो गद्दार निघाला त्यामुळं त्याची पक्षातून हकालपट्टी करतोय. यानंतर त्याचा स्वाभिमानी पक्षाशी जराही सबंध नाही.
याबाबत भुयार यांनी म्हटले आहे मी त्यांचे आभार मानतो, मला मझ्या मतदार संघातील विकासासाठी आघाडी सोबत संबंध ठेवावे लागतील. भुयार हे २०१९ च्या निवडणुकीत कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा पराभव करून विजयी झाले होते. भुयार यांची सुरवात पंचायत समिती सदस्य ते आमदार आशी आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतीमध्ये आता 'हाच' एकमेव पर्याय, पंजाबराव डख यांनी सांगितले गुपित...
शेतीपयोगी यंत्रांचा जादूगार अन शेती मध्ये नवनवीन कृषी यंत्र बनविणारा अवलिया! ..... श्री नामदेवराव आनंदराव वैद्य
Share your comments