1. बातम्या

दिवसभरातील शेती जगातील महत्त्वाच्या बातम्या; २४ मे २०२१: फळबाग लागवड उद्दीष्ट करण्याचे आदेश ते फिश अमीनो एसिड बनवण्याची पद्धत

दिवसभरात राजकीय घडामोडीच्या अनेक बातम्या प्रसारित होत असतात. पण यात ज्यावर आपलं जीवन अवलंबून असतं अशा क्षेत्रातील बातम्या मात्र आपल्यापर्यंत पोहचत नाहीत. सर्वांना भाकरी देणाऱ्या अशा कृषी जगताच्या आणि शेतकऱ्यांविषयीच्या बातम्या जाणून घेण्यासाठी वाचा कृषी जागरण मराठी.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
दिवसभरातील शेती जगातील महत्त्वाच्या बातम्या

दिवसभरातील शेती जगातील महत्त्वाच्या बातम्या

दिवसभरात राजकीय घडामोडीच्या अनेक बातम्या प्रसारित होत असतात. पण यात ज्यावर आपलं जीवन अवलंबून असतं अशा क्षेत्रातील बातम्या मात्र आपल्यापर्यंत पोहचत नाहीत. सर्वांना भाकरी देणाऱ्या अशा कृषी जगताच्या आणि शेतकऱ्यांविषयीच्या बातम्या जाणून घेण्यासाठी वाचा कृषी जागरण मराठी.

रोजगार हमी योजनेतंर्गत शेततळे व फळबाग लागवडीचे उद्दीष्ट कालमर्यादेत पूर्ण करा – कृषीमंत्री : राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जवळपास 38 हजार हेक्टर इतकी विक्रमी फळबाग लागवड झाली आहे. ही समाधानाची बाब असताना त्या तुलनेत जिल्ह्यातील आकडेवारी समाधानकारक नसल्याने मंत्री भुसे यांनी शेततळे व फळबाग लागवडीचे उद्दीष्ट विहीत कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

टाफेने(TAFE) शेतकऱ्यांसाठी विनामूल्य ट्रॅक्टर भाड्याने देण्याची योजना सुरु केली: टाफेने (TAFE)(ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड) या पीक हंगामात तामिळनाडूच्या छोट्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मोफत ट्रॅक्टर भाड्याने देण्याची योजना जाहीर केली आहे.मोफत ट्रॅक्टर भाड्याने देण्याच्या योजनेत अंदाजे 1,20,000 एकर जमीन येईल आणि सुमारे 50,000 शेतकर्‍यांना त्याचा फायदा होईल.

 

दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांवर संकट ! दुभत्या जनावरांचे भाव ३० टक्क्यांनी घसरले : कोरोनामुळे गेल्या दीड महिन्यापासून आठवडे बाजार बंद आहेत. तसेच दुधाचे दर प्रति लिटरमागे तब्बल दहा ते अकरा रुपयांनी पाडल्याने दुभत्या जनावरांच्या किमतीवर परिणाम झाला आहे. बाजार बंद असले तरी शेतकऱ्यांत समन्वयाने होणाऱ्या खरेदी- विक्रीच्या व्यवहारात ३० ते ३५ टक्के दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कृषी कायद्यासंबंधी केंद्रासोबत चर्चा साठी तयार : राकेश टिकैत : वादग्रस्त कृषी कायद्यासंबंधी शेतकरी संघटना केंद्र सरकार सोबत पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते राकेश तिकैत यांनी रविवारी म्हटले. परंतु त्यांचे म्हणणे आहे की, जर चर्चा झाली तर ही चर्चा कृषी कायदे मागे घेण्या विषयी असायला हवी. पुढे ते म्हटले की शेतकरी संघटनांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे किंवा आंदोलन स्थळावरून माघारी परतण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

फिश अमीनो एसिड बनवण्याची उत्तम व सुलभ पद्धत : फिश अमीनो एसिड हे मासोळीपासून बनविले जाणारे द्रावण आहे. विविध प्रकारच्या अमीनो असीडच्या अस्तित्वामुळे हे द्रावण वनस्पती तसेच सूक्ष्म जीवाणूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. काळ्या अथवा निळसर माशांपासून बनलेल्या द्रावणात उत्तम प्रकारचे अमीनो एसिड तयार होतात.

English Summary: Whole day Breaking news of farming world; 24 May 2021 Published on: 24 May 2021, 11:40 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters