1. बातम्या

अवकाळी पावसाचा फटका अलिबागच्या पांढरा कांद्याला देखील, उत्पादनात येऊ शकते 50 टक्यांाळ पर्यंत घट

अलिबागच्या कांद्याला जी आय मानांकन मिळाले असल्यामुळे या कांद्याची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. अवकाळी पाऊस आणि खराब हवामानाचा फटका कांदा पिकाला बसून शेतकऱ्यांवर दुबार लागवड करण्याची वेळ आली होती.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
white onion crop

white onion crop

अलिबागच्या कांद्याला जी आय मानांकन मिळाले असल्यामुळे या कांद्याची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. अवकाळी पाऊस आणि खराब हवामानाचा फटका कांदा पिकाला बसून शेतकऱ्यांवर दुबार लागवड करण्याची वेळ आली होती. 

पडणारे धुके आणि करपा रोगामुळे पांढऱ्या कांद्याचे उत्पादन पन्नास टक्‍क्‍यांनी घटणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.पांढरा कांद्याचे आता काढण्याची वेळ असल्याने नेमक्या काढणीच्या वेळेस या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने कांद्याचे पुरेशी वाढ न होता अपूर्ण वाढ झालेल्या कांदा काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. अलिबागच्या पांढरा कांद्याला  त्याचे औषधी गुणधर्मांमुळे वेगळी ओळख असल्यामुळे त्याला बाजारात मोठी मागणी आहे.

अलिबाग तालुक्यातील पांढरे कांद्याचे स्थिती

 अलिबाग तालुक्याचा विचार केला तर पांढरा कांद्याचे 250 ते 300 एकर शेती क्षेत्र आहे.मागच्या वर्षी 270 हेक्टर वर हे पीक घेण्यात आले. अलिबाग तालुक्यातील वाडगाव,वेश्वि,  मानतर्फे झिराड, कारले आणि खंडाळे अशा दहा ते बारा गावांमध्ये प्रामुख्याने पांढरा कांद्याचे पीकघेतले जाते.यावर्षीपांढरा कांद्याचेबी लागवडकेल्यानंतर नेमके रोपे उगवण्याच्या वेळेसच अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दुबार लागवड करावी लागली.

त्यानंतरही सातत्याने हवामानात बदल होत असून कडाक्याची थंडीतर कधी ढगाळ हवामान मध्येच पडणारे दाट धुके याचा एकत्रितपरिणाम कांदा पिकावर झालेला आहे. यावर्षी शेतकऱ्यांना पांढरा कांद्याचे पीक चांगले येईल अशी अपेक्षा होती परंतु ती अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे.

English Summary: white onion crop in alibaag district is destroy due to unseasonal rain and cloudy atmosphere Published on: 29 January 2022, 08:22 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters