साखर कारखान्यांनी गाळप केल्यानंतर उसाची रास्त व किफायतशीर किंमत (एफआरपी) शेतकऱ्यांना देणे अपेक्षित आहे. असे असताना मात्र त्यांना हे पैसे लवकर मिळत नाहीत. जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांनी ही रक्कम अजूनही दिलेली नाही.
यामध्ये जवळपास १८९ कोटी ८५ लाख ९३ हजार रुपयांची रक्कम थकित असल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना हे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या हंगामात पुणे जिल्ह्यातील जवळपास १७ साखर कारखाने सुरू झाले होते.
काही कारखाने हे चांगल्या पद्धतीने चालले. या साखर कारखान्यांनी सुमारे १ कोटी २६ लाख ६८ हजार ७८३ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून १ कोटी २६ लाख ४९ हजार ८७० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
नेपियर गवत कोळसा आणि सीएनजी गॅस तयार करणार, जाणून घ्या दुहेरी फायदा..
साखर उतारा सरासरी ९.९९ टक्के एवढा मिळाला आहे. यामुळे पैसे देण्यास काही अडचण नव्हती. या सर्व साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाची एफआरपीप्रमाणे चार हजार ३१९ कोटी ४७ लाख ९५ रुपये एवढी रक्कम होती.
त्यापैकी साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ४ हजार १२९ कोटी ६२ लाख २ हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे. असे असताना काही कारखान्यांनी पैसे दिले नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
सरकारी वाळू आली! पुणे जिल्ह्यात ११ ठिकाणी सरकारी वाळू उपलब्ध..
त्यामुळे ही रक्कम लवकरात लवकर द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. यामुळे आता शेतकरी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. यामुळे पैसे कधी मिळणार हे लवकरच समजेल.
1 जुलैपासून शेतकरी जनजागृती अभियान, राजू शेट्टी करणार रायगडावर मोठी घोषणा
दूध दर आंदोलन पेटले! सांगोल्यात रास्ता रोको, शेतकरी अडचणीत..
शेतकऱ्यांना मोठा झटका! गायीच्या दूधदरात 8 रुपयांची घसरण, पशुखाद्याच्या दर वाढले, शेतकरी आंदोलनाच्या तयारीत
Share your comments