भारत स्वातंत्र्य होऊन आज अनेक वर्ष उलटली, अनेक क्षेत्रात देशाने प्रगती केली, मात्र शेतकरी आहे तिथेच आहे. शेतकरी आत्महत्येत वाढच होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना यामधून बाहेर काढणे गरजेचे आहे. एका बाजूला सरकार आत्महत्यामुक्त महाराष्ट्र ही घोषणा करत आहे. मात्र आत्महत्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीत.
गेल्या 110 दिवसात 1100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. यंदा राज्यभरातच प्रथम अतिवृष्टी आणि नंतर परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, अनेक शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिके वाहून गेली. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला. त्यामुळेच परभणीत आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सभागी झाले होते.
LIC Jeevan Shiromani: 4 वर्षांच्या गुंतवणुकीत 1 कोटीपर्यंतचा फॅट फंड, जाणून घ्या सविस्तर..
यावेळी शेतकऱ्यांचा सरकारवर असलेला रोष आला. या मोर्चानंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. परभणी देखील यंदा 90 टक्के गावात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत होती.
उसाच्या गाळपात बारामती अॅग्रो सर्वात पुढे, जिल्ह्यात 18 लाख मॅट्रिक टन गाळप पूर्ण
असे असताना सरकारने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. यामुळे आता विरोधीपक्ष आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत. यासाठी आता शेतकरी रोडवर उतरत आहेत. यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांना दिवसाच वीज द्या! आता युवासैनिक उतरले मैदानात..
येत्या आठ दिवसांत मिळणार पीक विम्याची भरपाई रक्कम, अब्दुल सत्तार यांची माहिती
दोन राज्यपालपदे आणि दोन केंद्रीय मंत्रीपदे! शिंदे गटाच्या 'या' नेत्यांची लागणार वर्णी
Share your comments