राज्य
मागील तीन दिवसांपासून कोकण, पूर्व विदर्भात पावसाने मुसळधार पावसाने हजेरी (Havey Rain) लावली आहे. तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेशात पावसाचा जोर कमी आहे.
कोकणाच्या काही भागात पाऊस झाला आहे. त्यामुळे कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत.
मध्य महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय?
जळगाव, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्याच्या पूर्व भाग आणि नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, नगर या भागात हलका पाऊस बसरला.
मराठवाड्याच्या कोणत्या भागात पाऊस?
मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोपडले होते. परंतु आता या भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूरमध्ये पावसाचा जोर कमी आहे.
Share your comments