काळाच्या ओघात शेतकरी स्वतः आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पन्न काढत आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देत आता शेतकरी आधुनिक शेतीकडे ओळले आहेत जे की बाजारात मागणीच्या दृष्टीने विचार करून शेतकरी शेतात पीक घेत आहेत. तसेच निसर्गाचा हा अनियमितपणा त्यामुळे शेतकऱ्यांना नेहमी आर्थिक फटका बसतो तर दुसऱ्या बाजूस योग्य पद्धतीने नियोजन करून शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन काढत आहेत.
४०० रुपये किलोने टोमॅटो विकला जातोय :-
तुम्ही कधी चेरी किंवा द्राक्षाची चव असणारे टॉमेटो खाल्ले आहेत का ज्याची किमंत बाजारात ४०० रुपये आहे. हे टोमॅटो सेंद्रिय शेतीमध्ये पिकवले जात आहेत. मध्यप्रदेश मधील जबलपूर येथे पॉलिहाऊस मध्ये १२ महिने विकला जाणार ४०० रुपये किलो टोमॅटो चे उत्पादन घेतले जात आहे. परदेशात सुद्धा या टोमॅटो ला मोठी मागणी आहे जे की हे टोमॅटो अगदी चेरी सारखे चवीला लागतात ज्याची किमंत ४०० रुपये आहे. वर्षभर या टोमॅटो चे उत्पादन घेतले जात आहे.
अधिकचा दर अन् वर्षभर उत्पन्न :-
मध्यप्रदेश मधील जबलपूर येथे अंबिका पटेल यांनी टोमॅटो चा वाण विकसित केला आहे. पटेल अनेक वर्षांपासून या चेरी सारख्या चव असणाऱ्या टोमॅटो चा पुरवठा करत आहेत. पटेल यांनी अनेक कष्ट परिश्रम करून हा वाण विकसित केला आहे. अनेक वानांमधून हा चेरी सारखा दिसणारा टोमॅटो उदयास आलेला आहे. या टोमॅटो मधून आपल्या शरीरास उपयुक्त असे जीवनसत्वे सुद्धा भेटते त्यामुळे दिवसेंदिवस या टोमॅटो ची मागणी वाढतच निघाली आहे. पावसाळ्यात सुद्धा टोमॅटो चे उत्पादन थांबत नाही कारण हे टोमॅटो पॉलिहाऊस मध्ये लावले जाते.
पॅकिंगची पध्दतही निराळीच :-
या चेरीसारख्या टोमॅटो ची पॅकिंग पद्धत सुद्धा वेगळी आहे. हे टोमॅटो द्राक्षाच्या बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक करून काळजीपूर्वक ठेवावे लागते. चेरी टोमॅटो पिकाची लागवड करणे अवघड नाही पण याची वाहतूक करणे खूप अवघड आहे कारण रस्ते जर चांगले नसतील तर त्यास तडे जातात त्यामुळे योग्यरीत्या त्याची काळजी घ्यावी लागते. चेरी टोमॅटो ला सिंचनाद्वारे पाणी पुरवठा द्यावा लागतो. चेरी टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन चे प्रमाण खूप असते असे अंबिका पटेल यांनी सांगितले आहे.
Share your comments