नाशिक जिल्ह्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सध्या जिल्ह्यात कांद्याची लागवड जोरात चालू आहे त्यामुळे मजुरांची टंचाई भासत आहे तसेच कांद्याची लागवड योग्य वेळेत व्हावी यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहे. रात्रीचा दिवस करून शेतकरी शेतात राब राब कष्ट करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील कसमादेना परिसरातील मजूर दुसरीकडे जाऊ नयेत म्हणून तिथे रात्रीची कांदा लागवड चालू आहे ज्यासाठी अधिक पैसे देत आहेत. सध्या कांद्याची लागवड करताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे मात्र आता या वाढत्या क्षेत्रामुळे कांद्याला दर किती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
कांदा लागवडीस अशी आहे मजुरी:-
यंदा मजुरांची मजुरी जर पूर्वीच्या मजुरी तुलनेत केली तर अधिक प्रमाणात आहे. पूर्वी एका मजुराची मजुरी १५० ते २०० रुपये होती मात्र सध्या महिला मजूर तसेच पुरुष मजुराची मजुरी सारखीच आहे जशी की २५० - ३०० रुपये. परंतु रात्री जे मजूर कांदा लागवडीस येतात त्यांना यापेक्षा अधिक मजुरी दिली जात आहे. एका बाजूला खते, बियाणे तसेच कीटकनाशकांचे भाव वाढल्यामुळे शेतीला जास्त खर्च जात आहे आणि त्यात मजुरांना अधिकचा खर्च द्यावा लागत असल्याने शेतकरी घायाळ झाले आहेत.
शेतकऱ्यांना बुरे मजुरांना अच्छे दिन:-
रब्बी हंगामातील कांदा पिकाची लागवड सगळीकडे जोमाने सुरू आहे जे की नाशिक जिल्ह्यात पोषक वातावरण असल्याने कांद्याच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. त्यामुळे सध्या शेतकरी योग्य वेळेत कांद्याची लागवड होण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर दुसऱ्या बाजूस कांदा पिकासाठी लागणाऱ्या वस्तू आणि मजुरी इ. गोष्टीचा पुरवठा करावा लागत आहे. कांदा लागवडी दरम्यान शेतकऱ्यांचे बरे दिन तर मजुरांचे अच्छे दिन सुरू आहेत.
वाढत्या मजुरीमुळे छोट्या शेतकऱ्यांची अडचण:-
एका बाजूला शेतात लागवडीसाठी मजुरांची टंचाई तर दुसऱ्या बाजूस मजुरीमध्ये वाढ हा प्रश्न कायमचा असतो परंतु मजुरांची टंचाई भासत असल्यामुळे शेतकऱ्यांना आठ आठ दिवस वाट बघावी लागत आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. सध्या शेतीत कांद्याची लागवड करण्यासाठी रात्रीची कामे करावी लागत आहेत. पुढील काळात शेतीला आधुनिक अवजारांची गरज लागणार आहे तसेच पारंपरिक पीक पद्धतीवर अवलंबून न राहता इतर पिकांचा पर्याय शोधावा लागणार आहे. यामध्ये छोट्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
Share your comments