शेतकरी बंधू उत्पन्न आणि उत्पादनवाढीसाठी अमाप कष्ट घेत असतो. आणि त्यांच्या या पिकांना चांगला दर मिळला की त्यांची मेहनत सफल होते. सरकार देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवे धोरणे,योजना आखून त्यांना सहाय्य करत असते. मात्र आता हीच धोरणे शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहेत. पूर्वी घेतलेल्या तूर आयातीच्या निर्णयामुळे त्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे तर आता केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे त्याचा थेट परिणाम हा सोयाबीनच्या दरावर झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण होत आहे.
केंद्राने सोयाबीन पेंडीची आयात केली याचा परिणाम म्हणजे सध्या तब्बल 300 रुपयांची घसरण सुरु झाली. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.सध्या सोयाबीन हंगाम हा अंतिम टप्प्यात आहे. असं असलं तरी सोयाबीन पीक हे सबंध हंगामात हे चर्चेतले पीक मानलं जातं. शेतकऱ्यांना आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात विक्रमी दर मिळेल अशी आशा होती. त्यामुळेच अनेकांनी सोयाबीनची साठवणूकही केली. मात्र, केंद्राने घेतलेल्या निर्णयाचा गंभीर परिणाम सोयाबीन दरावर होताना दिसत आहे.
सोयाबीन पेंडीची आयात केल्याने येथील प्रक्रिया उद्योगावर त्याचा परिणाम झाला आहे. शिवाय सोयाबीन मागणीत घट झाली असून सोयाबीनला 7 हजार रुपये असा दर आहे.सोयाबीनच्या दरात दिवाळीनंतर वाढ होत गेली. तसेच प्रक्रिया उद्योजकांनी सोयाबीनची खरेदी करुन त्याची साठवणूक करण्यापेक्षा लागेल तसे सोयाबीन खरेदी करावे असा विचार केला. जेणेकरून उत्पादनाचा अंदाजही बांधता येणं शक्य होत. मात्र आता सोयाबीन पेंडची आयातच केली जात असल्याने अधिकच्या किंमतीमध्ये सोयाबीन खरेदी करुन त्यावर प्रक्रिया करण्यापेक्षा उद्योजकांनी खरेदीलाच मान्यता दिली. आता मात्र शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या सोयाबीनचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीनला चांगला दर मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूकीवर भर दिला होता. सुरुवातीला तसा दरही मिळाला. 7 हजार 600 रुपये क्विंटलवर दरही होते मात्र, यातून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवणूकीवरच भर दिला होता. आता केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे पुन्हा दरात घसरण होऊ लागली आहे. जर सोयाबीनची विक्री केली नाही तर अवघ्या 15 दिवसांमध्ये उन्हाळी सोयाबीन बाजारात दाखल करण्याशिवाय पर्याय नाही.
महत्वाच्या बातम्या;
Breaking: 'या' राज्यात वाढले दुधाचे दर; दूध उत्पादकांना मिळणार दिलासा
ऐकावं तेवढं नवलंच! या इसमाने तयार केला 'इको फ्रेंडली टी पॅक', आता चहाच्या पाकिटातूनही रोप उगवेल
याला म्हणतात जिद्द!! वडील मजूर, स्वतः भाजीपाला विकला; नऊ वेळा अयशस्वी तरी देखील न खचता शेवटी जज बनलाच
Share your comments