धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कांदा आणि मक्याच्या शेतात अफूचा मळा फुलवला असल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या हट्टी परिसरात कांदा आणि मक्याच्या शेतात अफूचा मळा फुलवला असल्याची बातमी पोलिसांना गुप्त सूत्रानुसार मिळाली आणि त्या अनुषंगाने निजामपुर पोलिसांनी छापा टाकत जवळपास 475 किलो अफूची झाडे जप्त केली आहेत.
पोलिसांच्या मते, जप्त केलेल्या मुद्दे मालाची बाजारात किंमत सुमारे पावणे बारा लाख एवढी आहे. निजामपूर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकत पावणे बारा लाखाचे अफूची झाडे जप्त केली तसेच या संदर्भात एका आरोपीला अटक देखील झाली आहे, पोलिसांच्या मते, एक आरोपी अजूनही फरार आहे.
साक्री तालुक्याच्या अतिदुर्गम भागात हट्टी परिसरात कांदा पिकात अफूची लागवड केल्याचे निजामपुर पोलिसांना गुप्त सूत्रांनी सांगितले निजामपुर पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत अफूची शेती उघडकीस आणले आणि तब्बल पावणे बारा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. हट्टी गावातील अतिदुर्गम भागात चिंतामण दमा पदमोर या शेतकऱ्याने अफूची लागवड केली होती, कोणाला संशय येऊ नये यामुळे त्याने कांद्याच्या पिकात आंतरपीक म्हणून अफूची लागवड केली होती. छापा टाकण्यासाठी आलेल्या पोलिसांना देखील दुरून बघितले असता अफूची झाडे नजरेस पडली नाहीत मात्र पोलिसांनी जेव्हा शेताची पूर्ण चौकशी केली तेव्हा अफूची झाडे असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी आसपासच्या क्षेत्रातदेखील अफूची लागवड केली आहे की काय या संशयामुळे शोधकार्य सुरू केले. तेव्हा त्यांना सोमा पांडू सूर्यवंशी यांच्या मक्याच्या शेतात अफूची लागवड सापडली. सोमा पांडू सूर्यवंशी यांच्या शेतात तब्बल पावणेपाच लाख रुपयांचे अफूचे झाडे पोलिसांना सापडलात आणि पोलिसांनी अफूचे झाडे ताब्यात देखील घेतले. चिंतामण दमा पदमोर याच्या शेतात देखील जवळपास सव्वा सात लाख रुपयांचे अफूचे झाडे ताब्यात घेण्यात आले आहेत.
पोलिसांनी दोन्ही ठिकाणाहून तब्बल पावणे बारा लाख रुपयांचा अफू ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी मुद्देमाल देखील जप्त केला आणि आरोपी चिंतामण दमा पदमोर याला देखील अटक केली आहे मात्र दुसरा आरोपी अजूनही फरार असल्याचे सांगितले गेले. पोलीस फरार आरोपी शेतकऱ्याच्या मागावर आहेत आणि लवकरच त्याला तुरुंगवासात डांबले जाईल असे पोलिसांनी सांगितले.
Share your comments