राज्यात सर्वत्र द्राक्ष लागवड केली जाते, मात्र नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष लागवड विशेष उल्लेखनीय आहे म्हणूनच नाशिक जिल्ह्याला द्राक्ष पंढरी म्हणून ओळखले जाते. गेल्या काही वर्षात गोदावरीच्या काठावरील अनेक गावात मोठ्या प्रमाणात द्राक्षाची लागवड केली गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्षाचे क्षेत्र आधीपेक्षा जास्त झाले आहे. गोदाकाठच्या गावात शेकडो हेक्टर वर द्राक्ष लागवड केली गेली आहे यातील अनेक द्राक्ष बागायतदारांनी द्राक्ष निर्यात करण्याच्या अनुषंगाने द्राक्षाची लागवड केली गेली असल्याचे सांगितले जात आहे.
शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सुमारे चार महिन्यात द्राक्षाचे पीक काढणीसाठी तयार होते असे असले तरी, यावर्षी अवकाळी पावसाच्या त्राहिमाम् मुळे द्राक्षाच्या बागा छाटणीसाठी उशीर झाला आणि ऑक्टोबर महिन्यात या हंगामात द्राक्षाची छाटणी केली गेली. त्यामुळे या हंगामात द्राक्षाच्या उत्पादनात थोडा उशीर होणार आहे आता द्राक्षाची फळे 80 दिवसांची झाली आहेत आणि येत्या काही दिवसात या हंगामातील द्राक्ष बाजारपेठेत नजरेस पडेल. आता जिल्ह्यातील द्राक्षांमध्ये साखर उतरण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे बागायतदारांकडून सांगितले जातं आहे. बागायतदारांच्या मते येत्या पंधरा दिवसात परिसरातील अनेक बागायतदारांचे द्राक्ष निर्यातीसाठी तयार होतील आणि तेव्हाच द्राक्षाची निर्यात सुरू होईल.
पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या विशेषता निफाड तालुक्यात या हंगामात जास्तीचा पाऊस नजरेस पडला, तसेच या हंगामात तालुक्यात समवेत संपूर्ण जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस नमूद करण्यात आला.
त्यामुळे द्राक्षबागा उशिरा फळधारणेसाठी तयार झाल्यात तसेच मध्यंतरी अवकाळी पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे तालुक्यासमवेतच जिल्ह्यातील द्राक्ष बागांवर मोठ्या प्रमाणात रोगांचे सावट नजरेस पडले. त्यामुळे द्राक्षाच्या उत्पादनात घट होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच नुकत्याच काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात कडाक्याची थंडी बघायला मिळाली जिल्ह्यात अजूनही थंडीचा जोर कायम असून यामुळे द्राक्ष मण्यांना तडे जात आहेत त्यामुळे द्राक्षाच्या उत्पादनात यावर्षी कधी नव्हे ती मोठी घट होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या एकंदरीत तयार झालेल्या परिस्थितीमुळे निर्यात केल्या जाणाऱ्या द्राक्षाच्या उत्पादनात घट झाली असून या हंगामात द्राक्षांना विक्रमी दर प्राप्त होईल असा आशावाद येथील बागायतदारांना आहे.
दरम्यान जिल्ह्यात अनेक द्राक्षबागायतदारांची पिळवणूक होत असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात कोरोनाचे सावट दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यात अनेक व्यापारी बागायतदारांना धाक दाखवून कमी दरात द्राक्षबागांचे बुकिंग करून घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रगत शेतकऱ्यांनी अशा व्यापार यांपासून बागायतदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे तसेच अद्यापही जिल्ह्यातील द्राक्ष बागा निर्यातीसाठी तयार झाल्या नसल्याने, आगामी काही दिवसात द्राक्षाचे आकार वाढतील आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील द्राक्षबागा निर्यातीसाठी तयार होतील असे सांगितले. तसेच प्रगत शेतकऱ्यांनी या हंगामात निर्यातक्षम द्राक्षांना उच्चांकी दर मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे.
Share your comments