दि. १ फेब्रुवारी २०२२ रोजी डाॅ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे 'लोकशाही पंधरवाडा' निमित्त वेबिनार आयोजन करण्यात आले होते. राज्य निवडणुक आयोग यांनी सुचित केल्याप्रमाणे दि. २६ जानेवारी २०२२ ते १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत लोकशाही पंधरवाडा साजरा करण्याचे ठरविले होते. त्या अनुशंगाने विद्यापीठ स्तरावर सदर वेबिनारचे आयोजन करण्यात आले. यामध्ये "लोकशाहीत मतदानाचे महत्त्व" या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर डॉ.भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस वंदन करून करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला अध्यक्ष डाॅ.पंदेकृवि ,अकोलाचे सम्माननीय कुलगुरू, डाॅ. विलास भाले सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन डाॅ. किरण कुरंदकर सर सम्माननीय सचिव राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र शासन हे होते. तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये कृषि महाविद्यालय,अकोला चे सहयोगी अधिष्ठाता माननीय डाॅ. माने सर ,तर संचालक विद्यार्थी कल्याण डाॅ. कुबडे सर होते. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठा अंर्तगत येणार्या सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी महाविद्यालयाचे माननीय सहयोगी अधिष्ठाता, प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी रा. से. यो व कमाडींग अधिकारी रा. छात्र.सेना,विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सम्माननीय कुलगुरू डाॅ. भाले सर यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदवुन मतदानाचा हक्क बजावण्याचे विद्यार्थ्यांना आव्हान केले.सदर लोकशाही पंधरवाडा निमित्त सम्माननीय कुलगुरू यांनी व्हिडीओ क्लिप व्दारे संदेश सुद्धा दिला त्याचे विमोचन या कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. माननीय श्री. कुरंदकर सरांनी true voter app ची माहिती देऊन मोबाईल वरुन मतदान यादीत नाव नोंदणी कशी करावी याचे मार्गदर्शन केले व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकी बाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्दितीय वर्षाची विद्यार्थीनी कु.श्रुती निचट हिने केले.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.यशवंत शंभरकर नोडल अधिकारी लिटरसी क्लब ,डाॅ.पंदेकृवि यांनी केले, कार्यक्रमाचे आयोजक डाॅ. प्रमोद वाळके, विभाग प्रमुख विस्तार शिक्षण डाॅ.पंदेकृवि,अकोला ,
डाॅ.संदीप लांबे, शाखा प्रमुख विस्तार शिक्षण कृ.म.वि,डाॅ.अनिल खाडे, नोडल अधिकारी महा वोटर कॅम्पीयन डाॅ.पंदेकृवि,अकोला यांनी केले.सदर वेबिनार यशस्वी करण्यामध्ये राज्य निवडणुक आयोगाचे सहायक संशोधक डाॅ.अविनाश पटोले सर व डाॅ. अनिल खाडे व डाॅ. यशवंत शंभरकर व तृतीय वर्षाचे विद्यार्थी श्याम काले, राम चांडक, धनश्री व्यवहारे, रेणू कदम, अक्षय माकणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रांजली चव्हाण हिने केले.या वेबिनार ला डाॅ. पंजाबराव देशमुख विद्यापीठ, अकोला अंतर्गत येणारा सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share your comments