1. बातम्या

विदर्भात गारपिटीची शक्यता; जाणून घ्या, का होते गारपीट

KJ Staff
KJ Staff


राज्यावर अवकाळी पावसाचे आणि गारपिटीचे संकट आले आहे. विदर्भात सध्या पावसाळी स्थिती असून विदर्भात गारपीट होईल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. अरबी समुद्राकडून वाहणारे वारे आणि मध्य प्रदेशापासून तमिळनाडूपर्यंत हवेच्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्याच्या हवामानात बदल होत आहेत. राज्यातील सर्वच ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात घट झाली असून पालघर तालुक्यात शुक्रवारी अवकाळी पाऊस पडला. नाशिक, औरंगाबाद, बीड परभणी, जळगाव आदी ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या खाली गेले आहे. 

मध्य महाराष्ट्रात थंड, कोकणात उकाडा, तर विदर्भ-मराठवाडय़ात पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सर्वत्र कोरड्या हवामानाच्या स्थितीमुळे तापमानात वाढ सुरू झाली आहे. समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानाची स्थिती बदलली आहे. सध्या विदर्भात वादळी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. ९ आणि १० मार्चला या भागात काही ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडणार  असल्याच्या इशारा हवामान विभागाने दिला आहे. गारपीटीमुळे शेतीचे मोठे नुकसान होत असते. विशेषत: मार्च महिन्यात गारपीट झाली तर शेतकऱ्यांचे आर्थिक मोठ्या प्रमाणात होत असते.

का होते गारपीट 

राज्यातील सर्वच भागात गारपिटीचे फटके बसत असतात. गार पडण्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत ठरतात. हवा जास्त उंचीपर्यंत गेली आणि हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त झाले तर गारपीट होत असते. पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागारावरून किंवा अरबी समुद्रावरुन येणारे वाऱ्यामुळे बाष्पाचे प्रमाण वाढते. हे वारे आपल्या सोबत बाष्प वाहून आणत असतात. हवा जास्त उंचीवर गेल्यास गारपीट होत असते. हवा वरती जाण्यासाठी कारणीभूत ठरते ते म्हणजे वाऱ्याचे जेट प्रवाह. हे अतिउंचावर असतात. फेब्रुवारी -मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडे सरकत असतात. त्याचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात. हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात असते अशी स्थिती निर्माण होते. ही स्थिती हवामाना अस्थिरता निर्माण करते, या स्थितीत बाष्पयुक्त वारे भरपूर उंचपर्यंत पोहेचतात. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक असतात.

अशा बनतात गारा

गार बनण्यासाठी ढग खूप उंचीपर्यंत जावे लागते. इतके उंच की ढगातील पाणी गाठू शकेल. गारा हे फक्त बर्फाचा गोळा नसतो. त्यात कांद्यासारखे पापुद्रे असतात. जितके पापुद्र जास्त असतात तितकी मोठी आणि जाड गार बनत असते.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters