पुन्हा काही दिवसांनी अवकाळी पाऊस पडणार आहे असा हवामान खात्याने अंदाज लावलेला आहे त्यामुळे या पाऊसाचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे या दरम्यान शेतकऱ्यांनी शेतात असणाऱ्या उभ्या पिकांवर फवारणी करू नये तसेच वातावरण बद्दलप्रमाणे मोहरीच्या पिकावर चापा कीड पडते तर त्यावर लक्ष ठेवावे. जास्त किडीचा प्रादुर्भाव झाल्यास कोरड्या वातावरणात ०.२५ मिली इमिडाक्लोपीड प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच हरभरा पिकावर घाटी अळीचा प्रादुर्भाव पडतो तर तो रोखण्यासाठी बांबूचे त्रिकोणी आकाराचे पक्षी प्रति एकर ८ तरी लावावे.
भाजीपाल्याच्या लागवडीसाठी पोषक वातावरण
सध्या हवामान खात्याने जरी पाऊसाचा अंदाज वर्तविला असेल तर त्यानंतर जे वातावरण होईल ते भाजीपालासाठी पोषक आहे. जर भोपळ्याची लागवड करायची असेल तर ही वेळ योग्य आहे तसेच कोबी, फुलकोबी रोपांची लागवड करायची असेल तरी सुद्धा चांगले वातावरण आहे. पालक, कोथिंबीर आणि मेथी या हंगामात लावू शकता. या भाजीपाल्याची चांगल्या प्रकारे वाढ व्हावी म्हणून तुम्ही एकरी २० किलो युरिया ची फवारणी करावी.
करपा रोगाचे नियंत्रण महत्वाचे
सध्याचे जे वातावरण आहे या वातावरणात बटाटा तसेच टोमॅटो पिकावर किडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो जे की करपा रोगामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे तुम्ही बटाटा आणि टोमॅटो वरती सारखे लक्ष ठेवा. या पिकांवर करपा रोगाची लक्षणे दिसताच प्रति लिटर पाण्यात १ ग्रॅम कार्बांडीजम किंवा ४५.२ ग्रॅम डिथेन-एम मिसळून फवारावे.
जर कांदा रोगावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास डेथेन-एम-45 ची फवारणी करावी तर वाटाणा पिकावर २ टक्के प्रमाणत युरिया सोल्युशन फवारावे लागणार आहे त्यामुळे वाटाण्याच्या शेंगाची संख्या वाढेल. २९ डिसेंम्बर पर्यंत तुम्ही या प्रकारे फवारणी केली तर तुम्हाला याचा फायदा होईलच शिवाय उत्पादन सुद्धा जास्त निघेल.
Share your comments