गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना (Farmer) पारंपरिक पिकातून अतिशय कवडीमोल उत्पादन मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करत हंगामी पिकांकडे (Seasonal Crop) आपला मोर्चा वळवला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातही शेतकरी बांधवांनी पारंपारिक पिकांऐवजी हंगामी पिकांना प्राधान्य देत टरबुज पिकाची लागवड (Watermelon Farming) केली होती.
मात्र सध्या टरबूज पिकाला अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याने उत्पादक शेतकरी (Watermelon Grower) पुरता भरडला जात असल्याचे चित्र तालुक्यात बघायला मिळत आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, तालुक्यातील हस्तपोखरी शिवारात अनेक शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात कलिंगड पिकाची (Watermelon Crop) लागवड केली होती.
शेतकऱ्यांनी कलिंगड पिकासाठी हजारो रुपयांचा खर्च करून अहोरात्र मेहनत घेतल्यानंतर कलिंगडचे यशस्वी उत्पादन घेतले. मात्र आता उत्पादित झालेल्या टरबुजाला अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याने येथील कलिंगड उत्पादक मोठ्या चिंतेत सापडले आहेत.
पावसाळ्यात मुबलक पाऊस झाल्यामुळे हस्त पोखरी शिवारातील शेतकऱ्यांनी कलिंगड या हंगामी पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. गावातील जवळपास 20 शेतकऱ्यांनी कलिंगड पिकाची लागवड केली. लागवड केल्यानंतर कलिंगड पीक जोपासण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च केला महागड्या औषधांची फवारणी केली अहोरात्र काबाडकष्ट केले आणि कलिंगड चे पिक यशस्वी उत्पादित केले. शेतकरी बांधवांना उत्पादित झालेल्या कलिंगड पिकापासून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा देखील होती.
मात्र शेतकऱ्यांची ही भोळी भाबडी आशा आता फोल ठरताना दिसत आहे. कारण की शिवारातील शेतकऱ्यांनी कलिंगड विक्रीसाठी नेले असता त्यांना 10 ते 12 रुपये प्रति किलो असा दर मिळत असून वाहतूक खर्च वजा जाता केवळ दोन ते तीन हजार रुपये त्यांच्याजवळ शिल्लक राहत आहेत. यामुळे शेतकरी राजा हैराण झाला आहे. एकंदरीत उत्पन्न वाढीचे अनुषंगाने हंगामी पीक लागवडीचा शेतकऱ्यांचा निर्णय फसला असून त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
महत्वाच्या बातम्या :
Share your comments