नुकतीच देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पार पडली. ही बैलगाडा शर्यत पुणे जिल्ह्यात भरवण्यात आली होती. बैलगाडा शर्यतीतून साधलं गेलेलं राजकारण कुणापासून लपलेलं नाही. बैलगाड्यांच्या शर्यतीबरोबर नेत्यांच्यात देखील मोठ मोठ्या इनामांची स्पर्धा भरली होती. भाजप नेते महेश लांडगे आणि त्यांनतर कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी राज्यातील पहिली महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत भरवली.
कर्जत येथे आमदार रोहित पवार यांनी राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. या बैलगाडा शर्यतीत राज्यभरातून सुमारे 500 पेक्षा अधिक बैलजोडींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत वाईच्या सचिन चव्हाण यांनी आघाडी मारली आहे. सचिन चव्हाण यांच्या रायफल आणि अर्जुन या बैलजोडीने बाजी मारली. या अटीतटीच्या स्पर्धाचा आनंद लुटण्यासाठी जवळजवळ 25 हजाराहून अधिक नागरिकांनी गर्दी केली होती.
या स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल 22 लाख रुपयांची भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली होती. या शर्यतीत एकूण 37 फिऱ्या घेण्यात आल्या. प्रत्येक फेरीत उपस्थित प्रेक्षकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. अंतिम टप्पा मात्र अतिशय थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या वाईतील सचिन चव्हाणांच्या बैलजोडीला दोन लाख 22 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले तर माळशिरस येथील तांबोळी यांच्या राणा ग्रुपने दुसरा क्रमांक पटकावला.
किशोर भिलारे हे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. विजेत्यांना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार झिशान सिद्दिकी यांच्यासह 11 आमदार यांची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या:
मोदी सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयावर जगभरातून टीका
खत विक्रीबाबत मोदी सरकारचा दिलासादायक निर्णय; शेतकऱ्यांचा होणार फायदा
Share your comments